१६.उपपदे : (The Articles)
English Grammar in Marathi
१६.उपपदे :
(The Articles)
इंग्रजी भाषेत A, An आणि The ही तीन उपपदे (Articles)आहेत. a, an आणि the ही पूर्वी विशेषणे होती. पण ती आता उपपदे म्हणूनच वापरली जातात. ती एक प्रकारे दर्शक विशेषणेच आहेत.
उपपदाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. अनिश्चित वा सामान्य उपपदे (Indefinite Articles ) व निश्चित वा विशेष उपपदे (Definite Articles) a आणि an ही अनिश्चित किंवा सामान्य उपपदे आहेत. आणि the हे निश्चित किंवा विशेष उपपद आहे.
उपपदे ही सामान्यनामाच्या पाठीमागे येतात. म्हणून सामान्यनामाच्या पूर्वी वापरलेल्या शब्दांना उपपदे असे म्हणतात.
A व An या अनिश्चित किंवा सामान्य उपपदाविषयी नियम :
एकवचनी सामान्य नामापूर्वी उपपद वापरतात (एकापेक्षा अधिक वस्तू असू शकणाऱ्या) एकवचनी नामापूर्वी प्रथमच उल्लेख करताना र किंवा रप वापरतात.
१. A हे उपपद व्यंजनाने सुरूवात झालेल्या अथवा ज्या स्वराचा उच्चार व्यंजनासारख्या होतो त्याच्या पाठीमागे येते.
उदाहरणार्थ :
A man, A chair, A university, A union.
२.ज्या नामदर्शक शब्दाची सुरूवात a, e, i, o, u या स्वरांनी होत असेल अथवा अनुच्चारित h ने होत असेल त्या नामाच्या पाठीमागे An हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
An ant, an eye, An ink-pot, An ox, an uncle, an hour.
३. काही सामान्य नामांच्या शब्दाची सुरूवात a, e, i, o, u या स्वरांनी होते, परंतु त्यांच्या उच्चारात सुरवातीला स्वर नसल्यामुळे an ऐवजी a हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
a unity, a university, a union, a European.
४.मोजता येण्याजोग्या (म्हणजे एकापेक्षा अधिक असणाऱ्या ) एकवचनी नामाच्या पाठीमागे A अथवा An हे उपपद वापरतात. अथवा हे उपपद पहिल्या वेळी व सामान्यपणे वापरतात. तेच नाम परत आले तर The हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
A cat is an animal. The cat is black.
I see a girl. The girl is beautiful.
५.एखाद्या जातिवाचक शब्दाच्या वर्गाचे उदाहरण म्हणून एकवचनी नाम वापरले असेल तर त्यापाठीमागे A अथवा An हे उपपद पहिल्या वेळी व सामान्यपणे वापरतात.
उदाहरणार्थ :
A cow has horns.
An elephant is a strong animal.
६.किंमत अथवा वेग दर्शविताना उपयोग करतात.
उदाहरणार्थ :
Tomatoes are sold rupee a kilo.
My car runs sixty miles an hour.
७.उद्गारवाचक वाक्यातील एकवचनी नामाअगोदर A अथवा An चा उपयोग करतात.
उदाहरणार्थ :
What a beautiful bird that is !
What an ugly word that is !
८.व्यवसाय किंवा धंदा दर्शविणारे किंवा व्यक्तीचे गुण-दोष सांगणाऱ्या शब्दावरुन ती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे हे सांगताना या उपपदांचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
His father is a teacher.
She is a doctor.
९. काही शब्दसमूहातच उपपदांचा अंतर्भाव असतो.
उदाहरणार्थ :
a number of
a lot of
for a while
a few
a little
in a sense
within a fraction of
a couple of
many a time
a token of
१०. मोजता येणाऱ्या वस्तुंच्या संबंधार्त ीीलह वापरलेले असेल तर उपपर्द ीीलह नंतर येते.
उदाहरणार्थ :
I have never seen such an object in the sky before.
Such a nice school.
११. So वापरताना विशेषण व नाम यांच्यामध्ये उपपद येते.
उदाहरणार्थ :
I have never seen so lazy a boy.
१२. Dozen, hundred, thousand यांच्यापूर्वी उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
a dozen mangoes (one dozen mango)
a hundred rupees.
१३. kind of, sort of पूर्वी उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
This is a kind of disease.
This is a sort of bad news.
---------
The या नियामक किंवा निश्चित उपपदाविषयी नियम :
विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा ठिकाणाचा उल्लेख करताना किंवा एकदा निर्देश केल्यानंतर पुन्हा त्याचाच उल्लेख करताना हे उपपद वापरतात.
१. एकमेव किंवा अद्वितीय म्हणून उल्लेख करताना हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The sun, The moon, The sky, The earth, The South Pole.
२. व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांच्या संपूर्ण वर्गाचे वा गटाचे प्रतिनिधिक स्वरुपात वापरलेल्या एकवचनी सामान्य नामापूर्वी हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The parrot is a sweet bird.
The ant is industrius.
३. विशिष्ट किंवा ठरावीक वस्तू किंवा व्यक्ती यांच्याबद्दल पूर्वीच्या संदर्भातील उल्लेख करताना किंवा खास जोर देऊन उल्लेख करताना हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The book you want is lost.
Let us go to the circus.
४.तमभाव दर्शविणाऱ्या विशेषणापूर्वी The हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
She plucked the most beautiful flower.
The Strongest, the highest, the best.
५.शब्दसमूह अथवा वाक्यांश यांच्या समावेशामुळे जेव्हा एखादे नाम निश्चित होते तेव्हा हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The girl in the red hat.
The man on the horse.
६.सहवासामुळे जेव्हा नाम एकच विशिष्ट गोष्ट दाखवते तेव्हा हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
Asha is in the garden.(म्हणजे घराच्या बागेत )
Please pass the spoon.(म्हणजे टेबलावरचा चमचा )
७.दुसऱ्या वेळी योजल्याने निश्चित झालेल्या नामापाठीमागे हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
There is a cuckoo in the garden. The cuckoo is singing.
८.समुद्र,नद्या, बेटांचे समुदाय, पर्वतांच्या रांगा अथवा संघराज्ये यांच्यापूर्वी ढहश हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The Pacific ocean, The Ganges, The Alps, The Netherlands, The U.S.C.
९.धर्मग्रंथ आणि काही प्रसिध्द ग्रंथ यांच्या नावामागे the वापरावे.
उदाहरणार्थ :
The Vedas, The Bible, The Ramayan.
१०.जहाजांच्या नावामागे the हे उपपद वापरावे.
उदाहरणार्थ :
The Tukaram, The Pride of India.
११.वर्तमानपत्राच्या नावामागे the वापरावे.
उदाहरणार्थ :
The Times of India, The Indian Express.
१२. तारीख दिनांक सांगताना किंवा क्रमवाचक संख्येच्या पूर्वी हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
the 25th of this month.
the first
the second
१३. बँकेची नावे, सरकारी खाते किंवा विभाग, दुकान, किंवा उद्योग इत्यादी व्यक्तीगत नावाने सुरु होत नसेल तर हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The Bank of India,
The Reserve Bank of India
१४. एकाच कुटुंबातील सर्व कुटुंबीयांचा उल्लेख करताना हे उपपद वापरतात.
उदाहरणार्थ :
The Gandhis, The Nehrus.
---------
अनिश्चित किंवा सामान्य उपपदांचा उपयोग कोठे टाळावा ?
१.अनेकवचनी नामाअगोदर अनिश्चित अथवा सामान्य उपपदे वापरू नयेत. या उपपदांना अनेकवचनी रूप नसते. म्हणून कुत्रा - A dog याचे अनेकवचन कुत्रे - dogs असे होते.
उदाहरणार्थ :
एकवचनी - A parrot is a bird.
अनेकवचनी - Parrots are birds.
एकवचनी - An ox is an animal.
अनेकवचनी - Oxen are animal.
२.जी नामे मोजता येत नाहीत असे इंग्रजीत समजले जाते ;त्यांच्या पाठी- मागे उपपदे वापरू नयेत.
उदाहरणार्थ :
advice, news.
He gave me good advice.
He gave me bad news.
३.मोजता न येण्याजोग्या नामापाठीमागे उपपदे वापरू नयेत.
उदाहरणार्थ :
paper, wood, milk इत्यादी.
I write on paper.
Chairs are made of wood.
A cow gives milk.
४.भाषावाचक नामाच्या पाठीमागे उपपदे वापरू नयेत.
उदाहरणार्थ :
truth, beauty.
५.दिवसाच्या, महिन्यांच्या आणि ऋतूंच्या नावामागे उपपदे वापरू नयेत.
उदाहरणार्थ :
Yesterday was monday.
I love May.
I like spring.
६.कला आणि शास्त्रे यांच्या नावामागे उपपद येत नाही.
उदाहरणार्थ :
Dancing and singing are difficult arts.
I love Biology and Physics.
७. इमारीत, बाग, रस्ते यांची सुरुवात जर विशेष नामाने होत असेल तर उपपद वापरु नये.
उदाहरणार्थ :
Mahatma Gandhi Road, Nehru Chowk, Netaji SubhashChandra Park.
८. संबोधनवाचक एकवचनी सामान्य नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
उदाहरणार्थ :
Friend, I like you.
Help me, brother.
९. दोन विशेषणे एकाच व्यक्ती किंवा वस्तूबद्दल वापरलेली असतील तर दुसऱ्या विशेषणापुर्वी उपपद येत नाही.
उदाहरणार्थ :
He is a clever and honest boy.
She is intelligent and hard working girl.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.