१५.केवलप्रयोगी अव्यये : (Interjections)
English Grammar in Marathi
१५.केवलप्रयोगी अव्यये :
(Interjections)
आपल्या मनातील आनंद, आश्चर्य, दु:ख, खेद इत्यादी भावना ज्या अविकारी शब्दाने व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
Alas, hurrah, oh, o हे शब्द बोलणाऱ्याच्या मनातील उत्कट भाव- भावना व्यक्त करतात. हे शब्द उद्गारवाचक शब्द आहेत. त्यांनाच केवलप्रयोगी अव्यये (Inter-jections) असे म्हणतात.
उदा. Alas! How sad !
या शब्दांचा वाक्यातील दुसऱ्या कोणत्याही शब्दाशी संबंध नसतो. त्यांच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह (Note of exclamation) घालतात.
साधी वाक्ये थोडासा बदल करून खालीलप्रमाणे उद्गारवाचक वाक्ये तयार करता येतात.
Rama is very happy - How happy Rama is !
The sun is shining brightly - How brightly the sun is shining !
विविध भावना व्यक्त करणारी केवलप्रयोगी अव्यये पुढीलप्रमाणे :
आनंददर्शक - Hurrah !, Ah ! Huzza !
दुख: किंवा शेकदर्शक - Alas !
आश्चर्यदर्शक - Oh !, What !, Ha !, Wow !
उत्साहवर्धक किंवा कौतुकासाठी - Bravo !
स्तब्धतावाचक - Hush !
संबोधनवाचक - Hello !, Hi !
संमतिदर्शक - Yeah !
आज्ञादर्शक - Hark !
काही वेळेस केवलप्रयोगी अव्यये शब्दसमुहातूनही व्यक्त होतात.
उदाहरणार्थ :
Well done !
Good Heavens !
My God !
Good God !
For Shame !
Oh dear me !
अप्रत्यक्ष कथन करताना ही अव्यये गाळतात आणि त्यांची जागा तो भावना व्यक्त करणारे इतर शब्द घेतात.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.