२८.विरामचिन्हे : (Punctuation)
English Grammar in Marathi
२८.विरामचिन्हे :
(Punctuation)
लिहिताना किंवा बोलताना ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला आपले म्हणणे समजावे यासाठी काही ठिकाणी स्वाभाविक पणे थांबतो, त्या जागा दाखविण्यासाठी लिहिताना काही खुणा किंवा चिन्हा वापरतो त्या खुणांना किंवा चिन्हांना विरामचिन्हे असे (Marks of Punctuation) म्हणतात.
१.पूर्णविराम (Full stop) --------- ( . )
वाक्यात सर्वांत जास्त वेळ थांबण्याची जागा हे चिन्ह दाखवते. थोडक्यात दीर्घकाळ थांबून वेगळेपण दाखविण्यासाठी पुर्णविरामाचा उपयोग होतो. ते विधानार्थी (Assertive ) अथवा आज्ञार्थी (Imperative) वाक्याच्या शेवटी घालतात. तसेच संक्षिप्त रुपे वापरल्यानंतर, नावाच्या आद्याक्षरानंतर, शीर्षकाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या क्रमांकानंतर पुर्ण विराम वापरले जाते.
उदाहरणार्थ :
There are twelve months in a year.
Open the door.
B. Com (Bachelor of Commerce)
R. H. Dave (Rahul Hari Dave)
17. Punction
----------
२. स्वल्पविराम (The Comma ) --------- ( , )
वाक्यात सर्वांत कमी वेळ थांबण्याची हे चिन्ह जागा दाखवते. ते खालील ठिकाणी वापरतात.
१.तीन अथवा तिनपेक्षा अधिक शब्द एकाच जातीचे आलेले असल्यास व त्यातील शेवटचे दोन शब्द and ह्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असल्यास त्यातील प्रत्येक शब्द स्वल्पविराम घालून वेगळा करतात.
उदाहरणार्थ :
Rama, Hari and Shivaji went to school.
टीप :- सामान्यत: हल्ली and च्या पूर्वी स्वल्पविराम घालण्याची पध्दत नाही.
२. संबोधन विभक्तीतील नाम विभक्त करताना त्याच्या मागे व पुढे स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ :
Do you know, John, who won the match?
Good evening, Gopal.
३. समानाधिकरण नाम अथवा शब्दसमूह विलग करण्यासाठी त्यांच्या मागे व पुढे स्वल्पविराम वापरतात. तसेच मुख्य वाक्य गौण वाक्यापासून वेगळे दाखविण्यासाठी स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ :
Hari, the best player in our class, won the price.
Khandekar, the greatest Mrathi novelist, wrote Yayati.
As soon as the sun rises, birds fly.
If you study hard, you will pass.
४. काही समसंयोगी उभयान्वयी अव्ययांपूर्वी स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ :
Hari is not only clever, but also humble.
५. बोलणाऱ्याच्या तोंडचे प्रत्यक्ष भाषण सांगताना ते स्वल्पविराम घालून बाकीच्या वाक्यापासून वेगळे दर्शवितात.
उदाहरणार्थ :
The teacher said, "Try again."
६. Yes आणि No या क्रियाविशेषणांच्या पुढे स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ :
Yes, Hari is my friend.
No, I can not speak English.
----------
३. अर्धविराम ( The Semicolon) -------- ( ; )
वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा जास्त, आणि पूर्णविरामापेक्षा कमी थांबतात त्या ठिकाणी हे अर्धविराम वापरतात. अर्धविरामानंतर सुरु होणाऱ्या वाक्य किंवा शब्द यांचे आद्य अक्षर कॅपिटल लेटर येत नाही. पुढील प्रमाणे त्याचे प्रमुख उपयोग :
१. जास्त लांबीची दोन अथवा अधिक उपवाक्ये एकमेकांपासून वेगळी करण्यासाठी त्यांच्यामध्ये अर्थविराम वापरतात.
उदाहरणार्थ :
Shivaji was a brave, large hearted man; and all honoured him.
२. विकल्प दर्शविणारी किंवा अनुमान दर्शविणारी उभयान्वयी अव्यये वापरुन जोडलेली वाक्ये विलग करण्यासाठी त्यांच्यामध्ये अर्धविराम वापरतात.
उदाहरणार्थ :
Rama will not win the race; for he does not run fast.
She went just in time to the bus station; otherwise she would have missed the bus.
३. सुटी किंवा वेगवेगळी उपवाक्ये एकमेकांपासून वेगळी करताना अर्धविरामाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
God gave him peace; his land reposed.
----------
४.प्रश्नचिन्ह (Question Mark / Note of Interrogation ) --------- ( ? )
प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. प्रश्नचिन्हानंतर नवीन शब्द किंवा वाक्य यांचे आद्य अक्षर कॅपीटल लेटर्स असते.
उदाहरणार्थ :
Have you finished your lesson ?
----------
५.उद्गारचिन्ह (The Note of Exclamation) ------ ( ! )
केवलप्रयोगी अव्यय, उद्गारवाचक शब्द व उद्गारवाचक वाक्ये यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :
Alas ! my dear cat is deat !
Brave ! well done Subhash !
What a sweet song this is !
---------
६.अवतरणचिन्ह (Quotation Marks / Inverted commas ) -------- ( " " )
बोलणाऱ्या व्यक्तीचे उद्गार किंवा सर्व शब्द जसेच्या तसेच दाखविण्यासाठी किंवा त्याने बोललेला अथवा लिहलेला एखादा उतारा द्यावयाचा असता, ते शब्द किंवा उतारा अवतरणचिन्हात घालतात.
उदाहरणार्थ :
Ravi said," We will go first in to the temple. I shall by some flowers."
----------------
७.गलिताक्षर चिन्ह किंवा षष्ठीदर्शक चिन्ह ( Apostrophe) --------- ( ' )
वाक्यात जेथे एक अथवा अनेक अक्षरे गाळलेली आहेत असे दाखवायचे असते तेथे गलिताक्ष किंवा षष्ठीदर्शक चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :
I'll go to Poona today .( येथे I will या दोन शब्दांतील wi ही अक्षरे गाळलेली आहेत.)
That's a good idea. ( येथे That is या दोन शब्दांतील i हे अक्षरे गाळलेले आहे.)
------------
८.अपसरण चिन्ह (The dash) ---------- ( - )
वाक्यामध्ये आकस्मिक थांबणे, अथवा विचारातील बदल दर्शविण्यासाठी अपसरण चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :
If my parents were alive - but why lament the past.
विखुरलेले कर्ते सारांशरुपाने सांगताना अपसरण चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :
Friends, Companions, relatives - all deserted him.
पुनरावृत्तिदर्शक शब्द किंवा शब्द समूह यापूर्वी अपसरण चिन्ह वापरतात.
He was tired - tired of studying.
------------
९. संयोग चिन्ह (The Hyphen) ---- ( - )
जोडनामे किंवा नातेदर्शक जोडशब्द लिहिताना संयोग चिन्हाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
great-grandmother
father-in-law
-----------
१०. पर्यायवाचक चिन्ह ( The Slash) ----- ( / )
वाक्यामध्ये किंवा अशा अर्थाने या चिन्हाचा वापर होतो.
दोन शब्द, वाक्ये, पोटवाक्ये यांच्यामध्ये पर्यायवाचक चिन्हा वापरल्यास दोहोंपैकी कोणताही एक असा अर्थ होतो.
उदाहरणार्थ :
My sister / brother will be at home.
तारखा किंवा दिनांक, अपूर्णाक किंवा संक्षिप्त रुपे दाखविताना पर्यायवाचक चिन्ह वापरतात.
25/11/1996
5/8, 3/5
C/o (Care of)
-----------
११. कंस चिन्ह (The Bracket) ------- ( [ ] )
वाक्यातील शब्दांचा किंवा शब्दसमूहाचा वेगळेपणा दाखविण्यासाठी कंस या चिन्हाचा वापर करतात.
Shakuntal [the best drama in Sanskrit] was written by Kalidas.
***********
२९. शब्दसंक्षेप किंवा संक्षिप्त रुपे (Contractions) :
बोलताना आणि लिहिताना संक्षिप्त रुपांचा वापर करतात.
१. संपूर्ण शब्दाऐवजी एक अक्षर किंवा शब्दसमूहाऐवजी ठरावीक शब्द वापरुन संक्षिप्त रुप वापरतात.
उदाहरणार्थ :
Master of Arts संक्षिप्त M.A.
Bachelor of Laws - LL.B.
Kilogramme - Kg
२. शब्द एकत्रित करुन वापरताना त्यातील एखादे किंवा अनेक अक्षरे वगळणे व त्याएवजी गलिताक्षर चिन्ह किंवा षष्ठीदर्शक चिन्ह ( Apostrophe) वापरुन संक्षिप्त रुप वापरतात. असे संक्षिप्त रुप संदर्भ किंवा अर्थ लक्षात घेऊन वापरतात.
उदाहरणार्थ :
I am - I'm - आइम्
I shall / I will - I'll - आइल्
I have - I've - आइव्ह
I should / I would / I had - I'd - आइड्
We are - We're - वीअर्
We have - We've - वुइव्ह
We shall / We will - We'll - वुइल्
We would / We had - We'd - वुइड्
You are - You're - युअर्
You will - You'll - युइल्
You have - You've - युव्ह्
You would / You had - You'd - युड
He is - He's - हीज्
He will - He'll - हील्
He would / He had - He'd - हीड्
She is - She's - शीज्
She will - She'll - शील्
She would / She had - She'd - शीड्
It is / It has - It's - इट्स
It will - It'll - इटील्
It would / It had - It'd - इट्ड्
They are - They're - देअर्
They will - They'll - देइल्
They would / They had - They'd - देड्
They have - They've - देव्ह
is not - isn't - इझण्ट्
was not - wasn't - वाझण्ट्
are not - aren't - आरण्ट्
were not - weren't - वेअरण्ट्
have not - haven't - हॅवण्ट्
has not - hasn't - हॅझण्ट्
had not - hadn't - हॅडण्ट्
do not - don't - डोण्ट्
does not - doesn't - डझण्ट
did not - didn't - डिडन्ट्
shall not - shan't - शान्ट्
should not - shouldn't - शुडन्ट्
will not - won't - वोन्ट्
would not - wouldn't - वुडन्ट्
can not - can't - कान्ट्
could not - couldn't - कुडन्ट्
must not - mustn't - मसन्ट्
need not - needn't - नीडन्ट्
dare not - daren't - डेअरन्ट्
Here is - Here's - हिअर्स्
what is - what's - व्हॉट्स
Let us - Let's - लेट्स
That is - That's - दॅट्स
How is - How's - हाऊझ्
Who is - Who's - हूझ्
Where is - Where's - व्हेअर्स्
There is - There's - देअर्स्
Nobody is - Nobody's - नोबडीज्
Everyone is / Everyone has - Everyone's - एव्हरीवन्स्
That will - That'll - दॅटील्
Where ever - Where'er - व्हेअरअर्
Whosoever - Whosoe'er - हूसोएअर्
Because - Cause - कॉज्
It is - Tis - टीज्
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.