१७. प्रश्नार्थक वाक्ये : (Interrogative Sentences)
English Grammar in Marathi
१७. प्रश्नार्थक वाक्ये :
(Interrogative Sentences)
प्रश्नार्थक वाक्ये : संमतीसाठी, होकार / नकार यासाठी किंवा माहिती मिळविण्यासाठी प्रश्नांचा उपयोग करतात. असे प्रश्न दोन प्रकारचे आहेत:
१. Yes / No type questions
२. Wh - questions (Wh - शब्दांनी सुरू होणारे प्रश्न.)
१. Yes / No type questions/ Verbal questions:
जर विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक स्वरूपात वाक्य करावयाचे असेल तर खालीलपैकी साहाय्यकारी क्रियापदांचा किंवा त्यांच्या रूपांचा उपयोग करतात.
be : am,are, is, was, were.
have : have, has, had.
do : do,does, did.
shall, will, can, could, may, must, need इत्यादी.
प्रश्नाचे स्वरूप खालीलप्रमाणे :
प्रथम साहाय्यकारी क्रियापदाचे रूप, नंतर कर्ता व नंतर कर्म/ पूरक व इतर शब्द. म्हणजेच -
१.प्रश्नाची सुरूवात साहाय्यकारी क्रियापदाने होते.
२.त्यामुळे त्या रूपाचे आद्याक्षर मोठया लिपीत येते.
३.त्यानंतर मूळच्या वाक्यातील कर्ता (नाम/सर्वनाम)
४.आद्याक्षर नसल्यामुळे या सर्वनामाचे आद्याक्षर मोठया लिपीत येत नाही.
५.नंतर इतर शब्द.
६.शेवटी प्रश्नचिन्ह.
उदाहरणार्थ :
1.He is a teacher.
Is he a teacher ?
2.Anyone can be a hero.
Can anyone be a hero?
3. I felt insulted.
Did I feel insulted ?
4. Vegetarian diet preferable.
Is vegetarian diet preferable ?
5.She was just a mute spectotor.
Was she just a mute spectator ?
---------
२. Wh - Questions (Wh - शब्दांनी सुरू होणारे प्रश्न.) :
प्रश्न विचारण्यासाठी Wh - शब्द वाक्याच्या सुरूवातीला वापरतात.
Wh - शब्दानंतर साहाय्यकारी क्रियापद येते किंवा त्याचे रूप येते.
त्यानंतर कर्ता/कर्तृवाचक शब्द येतो.
जर साहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापद वेगळे असेल तर कर्तानंतर मुख्य क्रियापद मूळ स्वरूपात वापरतात.
शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात.
या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर फक्त Yes किंवा No अशा शब्दांनी देता येत नाही.
Wh - शब्द खालीलप्रमाणे आहेत:
what, where, when, why, who, whose, whom, how, how much, how many, how far, how long etc.
या प्रकारच्या वाक्यांची रचना खालीलप्रमाणे :
Wh - शब्द + साहाय्यकारी क्रियापद + कर्ता + मुख्य क्रियापद
साहाय्यकारी क्रियापदच मुख्य क्रियापद म्हणून वापरल्यास रचना खालीलप्रमाणे :
Wh - शब्द + साहाय्यकारी क्रियापद + कर्ता.
जेव्हा मूळच्या वाक्यात साहाय्यकारी क्रियापदाचे रूप वापरलेले नसते तेव्हा do हे साहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरतात व त्याची do, does, did ही रूपे आहेत. Do चे रूप वापरल्यानंतर मुख्य क्रियापद मूळ रूपात येते. Do चे रूप मूळच्या वाक्याचा कर्ता व काळ यानुसार वापरावे.
What चे प्रश्न :
1.What is your name ?
My name is Ramesh.
2.What colour is the bag ?
The bag is green.
3.What is your father?
My father is a Cook.
4.What is this?
This is a book.
5.What time is it ?
It is 7 O'clock.
------------
Where, When, Why चे प्रश्न :
1.Where is the book ?
The book is on the table.
2.When is the function ?
The function is in the evening.
3.Why was he joyful ?
He was joyful because he passed the examination.
4.Where will she keep her book ?
She will keep her book in the bag.
5.When will you go to Pune?
I shall go to Pune next week.
6.Why should we buy a TV ?
We should buy a TV for education.
------------
Which चे प्रश्न :
विशिष्ट व्यक्ती किंवा स्थळ किंवा वस्तू निर्देशित करण्यासाठी, Which या शब्दाचा प्रश्न विचारण्यासाठी वापर करतात. दोहोंपैकी किंवा अनेकांपैकी नेमका कोणता अशाही प्रश्नांसाठी याचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
1.Which will you have, a pen or a pencil?
I will have a pen.
2.Which way shall we go ?
We will go by the shortest route.
3.Which class do you study in ?
I study in class V.
4.Which ball is bigger, red or black?
Red ball is bigger than the black one.
------------
How / How many / How much / How far / How long चे प्रश्न :
How म्हणजे कसा किंवा कशा रीतीने किंवा कशा प्रकारे ?
How many म्हणजे किती ? (संख्यात्मक)
How much म्हणजे किती ? (मोजता न येण्यासारखे)
How far म्हणजे किती दूर ? (अंतर सांगण्यासाठी)
How long म्हणजे किती वेळ किंवा किती काळ ? (वेळ किंवा समय सांगण्यासाठी)
उदाहरणार्थ :
1.How old is she ?
She is ten years old.
2.How did they reached the hill ?
They reached the hill safely.
3.How many boys were present ?
Only nine boys were present.
4.How much sugar do you want?
I want two spoonfuls of sugar.
5.How far is you house?
It is too far.
6.How long will it take to reach the school ?
It will take half an hour to reach the school.
------------
Who / Whom / Who..... to / Whose चे प्रश्न :
Who म्हणजे कोण ? याची द्वितीया विभक्ती whom म्हणजे कोणाला (Who.... to ) आणि षष्ठी विभक्ती Whose म्हणजे कोणाचा?
Who च्या प्रश्नाचा एक प्रकार म्हणजे विशिष्ट व्यक्ती/ नाम किंवा सर्वनाम यांच्यासाठी, ऐवजी Who वापरून प्रश्न विचारणे.
उदाहरणार्थ :
1.Who told stories ?
Seeta told stories.
2.Who won the match ?
Our team won the match.
3.Whom does she give the book ?
She gives the book to her friend.
4.Whose dog is this ?
That os my dog.
5.Who it it?
It is suman.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.