२६. वाक्य एकत्रिकरण : (Synthesis of Sentences)
English Grammar in Marathi
२६. वाक्य एकत्रिकरण :
(Synthesis of Sentences)
एकत्र करणे या अर्थी Synthesis हा शब्द वापरला जातो.
१. साधी वाक्ये एकत्र करुन त्यांचे एक साधे वाक्य बनविणे ( Combining simple sentences in one simple sentence)
१. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्ये धातूसाधित विशेषण (participle) वापरुन त्यांचे एक साधे वाक्य बनविणे.
उदाहरणार्थ :
Rama confessed. He was forgiven.(Two sentences)
Having confessed Rama was forgiven.
She stopped in the garden. She looked to the right and left. She plucked the flower. (Three sentences)
Stoping in the garden and looking to the right and left she plucked the flower.
२. Infinitive वापरुन दोन साधी वाक्य एकत्र करुन एक साधे वाक्य बनविता येते.
उदाहरणार्थ :
I have some duties. I must perform them. (Two sentences)
I have some duties to perform.
३. Adverb किंवा Adverbial phrase वापरुन दोन साधी वाक्य एकत्र करता येतात.
उदाहरणार्थ :
Suresh deserved to succeed. He failed.
Suresh failed undeservedly.
The sun set. The girls had not finished the game.
The girls had not finished the game by sunset.
४. Noun or Noun in Apposition वापरुन दोन साधी वाक्य एकत्र करता येतात.
उदाहरणार्थ :
Lata is my sister. She is very clever.
Lata, my sister is very clever.
Milton was a great poet. He wrote fine poetry.
Milton, a great poet, wrote fine poetry.
५. शब्दयोगी अव्ययांच्या मदतीने नाम किंवा कृदन्त (Gerund) वापरुन दाने साधी वाक्य एकत्र करता येतात.
उदाहरणार्थ :
The sun rose. Their journey was not ended.
The sun rose before the end of their journey.
Dilip was failed many times. He still hopes to succeed.
In spite of many failures Dilip hopes to succeed.
६. Nominative Absolute वापरुन दोन साधी वाक्य एकत्र करता येतात.
उदाहरणार्थ :
The soldiers arrived. The mob dispersed.
The soldiers having arrived, the mob dispersed.
------------
२. Compound Sentences संयुक्त वाक्ये एकत्र करणे.
१. एकास एक याप्रमाणे वाक्ये जोडून कल्पना व्यक्त करताना and, as well as, not only but also, both उभयान्वयी अव्ये वापरतात. या उभयान्वयी अव्ययांना Comulative Conjuctions असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Ramesh is slow. He is sure.
Ramesh is slow but he is sure.
२. विरोध किंवा फरक दर्शविल्याजाणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना Adversative conjuctions असे म्हणतात. ती but, still, yet, nevertheless, only ही उभयान्वयी अव्यये या प्रकारात मोडतात.
उदाहरणार्थ :
Asha sang a sweet song yet no one praised her.
३. जेव्हा एखादा विचार मांडताना दोन पर्याय मांडलेले असतात व त्यापैकी एक निवडायचा अशी कल्पना व्यक्त करावयाची असेल तेव्हा or, either-or, neither-nor ही उभयान्वयी अव्यय वापरतात यांना Alternative conjunctions असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Latona is neither clever nor wise.
४. निष्कर्ष किंवा कारण सांगावयाचे असेल तेव्हा therefore, so, for ही उभयान्वयी अव्यये वापरतात यांना Illative conjunctions असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Ramesh was guilty therefore he was punished.
It is raining heavily, so I will take a rainy-coat with me.
-----------
३. Complex Sentences मिश्र वाक्ये एकत्र करणे.
मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य मुख्य वाक्य असते व बाकीची गौण वाक्ये असतात. व गौण वाक्ये मुख्य वाक्यावर अवलंबून असतात. गौण वाक्य तीन प्रकारची असतात. त्यानुसार मिश्र वाक्यांचे एकत्रीकरण पुढील प्रमाणे :
१. Noun Clause :
उदाहरणार्थ :
Ramesh is clever. I admit it.
I admit that Ramesh is clever.
या वाक्यात that Ramesh is clever हे Noun Clause आहे व ते या वाक्यात admit या क्रियापदाचे कर्म आहे.
You are cruel. I will not forget it.
I will not forget that you are cruel.
या वाक्यात that you are cruel हे रNoun Clause आहे व ते will not forget या क्रियापदाचा कर्ता आहे.
Satish is clever. This is my opinion.
My opinion is that Satish is clever.
या वाक्यात that Satish is clever हे Noun Clause आहे व ते ळी या क्रियापदाचे पूरक आहे.
२. Adjective Clause :
उदाहरणार्थ :
This is the bunglow. My father built it.
This the bunglow which my father built.
३. Adverb Clause :
उदाहरणार्थ :
I waited for Satish. I waited till his arrival.
I waited for Satish until he came.
या वाक्यात until he came हा clause वेळ दाखवितो म्हणून तो Adverb clause of time आहे.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.