भाषा :
इंग्रजी व्याकरण :
प्रकरण १ :
पाठ १:
भाषा :
विचार प्रकट करणे ते व्यक्त करणे, त्यांची देवाण-घेवाण करणे हे भाषेचे प्रमुख कार्य.
भाषेचे मुख्य दोन प्रकार :
१) नैसर्गिक भाषा
२) सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा.
नैसर्गिक भाषा प्राण्यांमध्ये वापरताना जाणवते, तर सांकेतिक किंवा कृत्रिम भाषेमध्ये चिन्हांचा समावेश होतो ती आपण वापरतो.
अशा विशिष्ट चिन्हांचा वापर करुन लेखनात व बोलताना किंवा विचार प्रकट करताना वापरतो तिला आपण भाषा म्हणतो. त्यामध्ये वर्णमाला, अक्षरे, आकडे इत्यादींचा समावेश होता. यालाच आपण लिखित स्वरुपात लिपी म्हणतो.
अक्षरे, शब्द,वाक्य आणि व्याकरण हे कृत्रिम किवा सांकेतिक भाषेचे घटक होय. एक किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरांनी शब्द तयार होतो, एक किंवा असंख्य शब्दांनी वाक्य तयार होते. अक्षरांनी शब्द व शब्दांनी वाक्य तयार करताना त्या शब्दांची मांडणी विशिष्ट प्रकारे केली जाते ज्यामुळे त्या वाक्याचा अर्थ बोध होईल व तो अर्थ सहजपणे समजला जाईल. अशी शब्दांची मांडणी म्हणजे व्याकरण म्हणता येईल.
उदा :
१) ती व्यक्ती आहे.
२) ती व्यक्ती होती.
३) ती व्यक्ती असेल.
आता यामध्ये ती हा शब्द त व ई अशा स्वर व व्यंजनाने (या अक्षरांनी)तयार झाला. अशाप्रकारे व व्यक्ती व आहे हे शब्द देखील स्वर व व्यंजनांनी तयार झाला व या तीन शब्दांनी मिळून वाक्य तयार झाले.
वरील तिनही वाक्यांमध्ये व्याकरणा स्वरुपात मांडणी केली असता तिनही वाक्यांचा वेगवेगळा अर्थ बोध होतो. म्हणजेच आहे, होती व असेल या शब्दांनी अर्थ बदलला.
बोली भाषेमध्ये व्याकरणाचा समावेश नकळत पणे येतो, परंतु लेखन करताना त्यामध्ये विचार, मते इत्यादी मांडताना व्याकरणाची मदत घेतली जाते.
आपल्या बोलताना जे शब्द उच्चार करतो त्यांना वर्ण असे म्हणतात, इंग्रजी मध्ये वर्णाक्षरे किंवा मुळाक्षरे २६ आहेत. या २६ वर्णाक्षरांनी किंवा मुळाक्षरांनी मिळून बनते तीला इंग्रजी वर्णमाला म्हणता येईल. इंग्रजी आपण अल्फाबेट म्हणतो.
इंग्रजी मध्ये मुळाक्षरे मुख्यतो दोन प्रकारे लिहतात :
१) मोठे अक्षर (कॅपिटल लेटर्स) :
२) लहान अक्षर (स्मॉल लेटर्स) :
हे दोन प्रकार जलद गतिने लिहताना त्यांचे धावते किंवा प्रवाही किंवा जोडून लिहलेले मोठे अक्षर (कर्सिव्ह कॅपिटल लेटर्स) व धावते किंवा प्रवाही किंवा जोडून लिहलेले (कर्सिव्ह स्मॉल लेटर्स) असे प्रकार पडतात.
मोठी अक्षरे (कॅपिटल लेटर्स) :
A - ए , B - बी, C - सी, D - डी, E - ई, F - एफ्, G - जी, H - एच्, I - आय्
J - जे, K - के, L - एल्, M - एम्, N - एन्, O - ओ, P - पी, Q - क्यू, R - आर्
S - एस्, T - टी, U - यू, V - व्ही, W - डब्ल्यू, X - एक्स्, Y - वाय्, Z - झेड्
लहान अक्षरे (स्मॉल लेटर्स) :
a - ए, b - बी, c - सी, d - डी, e - ई, f - एफ्, g - जी, h - एच्, i - आय्
j - जे, k - के, l - एल्, m - एम्, n - एन्, o - ओ, p - पी, q - क्यू, r - आर्
s - एस्, t - टी, u - यू, v - व्ही, w - डब्ल्यू, x - एक्स्, y - वाय्, z - झेड्
या २६ अक्षरांनी मिळून बनलेल्या वर्णमालेचे दोन भाग पडतात.
१) स्वर (Vowels) :
२) व्यंजन (Consonants) :
a, e, i, o, u हे पाच इंग्रजी भाषेत स्वर आहेत व इतर अक्षरे व्यंजन.
थोडक्यात स्वर व व्यंजनांनी मिळून लेखनासाठी वापरण्यात येणारी पद्धती म्हणजे लिपी म्हणता येईल.