२७. मोठी अक्षरे : (Capital Letters)
English Grammar in Marathi
२७. मोठी अक्षरे :
(Capital Letters)
इंग्रजी भाषेत दोन प्रकारची मुळाक्षरे आहेत.
मोठी अक्षरे (capital letters )
लहान अक्षरे (small letters)
१.मोठी अक्षरे (capital letters ) - A, B, C, D , E, F इत्यादी
२.लहान अक्षरे (small letters) - a, b, c, d , e, f इत्यादी
नेहमी लिखाणात लहान अक्षरेच बहुधा वापरली जातात. पण काही ठिकाणी मोठया अक्षरांचा (Capital letters) चा वापर करतात. मोठी अक्षरे कोठे वापरावीत यासंबंधी काही नियम आहेत.
१. वाक्याचा आरंभ मोठया अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
Gold is yellow
He is a clever boy.
२.विशेषनाम व त्याच्यापासून बनलेले विशेषनाम यांचा आरंभ मोठया अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
She is my sister, Lata.
Bombay is capital of Maharashtra.
The Ganges is a holy river.
The Russians are the people who live in Russia.
३.परमेश्वर (God ) या अर्थाची नामे (Nouns) व त्यांच्याबद्दल वापरलेली सर्वनामे हयांचा आरंभ मोठया अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
If Sita prays to God, He will bless her.
४.प्रथम पुरूषवाचक सर्वनाम I व केवलप्रयोगी अव्यय O हे शब्द नेहमी मोठया अक्षरात लिहितात.
उदाहरणार्थ :
O God, please listen to my prayer !
If I meet him, I shall give him a good treatment.
५.अवतरणचिन्हातील पहिल्या वाक्याचा आरंभ मोठया अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
My brother said to me, "Who has seen the wind ?"
"Wait till I call you," he said.
६.काव्यातील प्रत्येक नव्या ओळीचा आरंभ मोठया अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
I went to the wood of flowers.
No one ws with me.
७. महिना, वार व सणांच्या नावाचा आरंभ मोठ्या अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
Sunday, March, Dipawali
८. पदवी, हुद्या किवा संक्षिप्त रुपांचा आरंभ मोठ्या अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
B.A., B.Com., M.D., J.M.
९. धार्मिक ग्रंथांचे पहिले अक्षर मोठ्या लिपीत असते.
उदाहरणार्थ :
Bhagwat Gita, Kuran, Bible.
१०. सरकारी शाखा किंवा खाती, संघटना, उद्योगसमूह, किंवा संस्थांच्या नावाचे आद्याक्षर मोठ्या लिपीत असते.
उदाहरणार्थ :
World Health Organisation, Shivaji University, Vikas High School.
११. विशिष्ट इमारती, पूल, अवशेष, रस्ते, बागा, आगगाड्या, विमाने, अवकाशयान यांच्या नावाचा आरंभ मोठ्या अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
Shivaji Park, Janta Express, Ellora Caves, Deccan Queen.
१२. विशिष्ट स्थल, दिशादर्शक शब्द किंवा भौगोलिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे यांच्या नावाचा आरंभ मोठ्या अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
North Pole, South Pole, Milky Way, Indian Ocean, Far East.
१३. एैतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक कालखंड किंवा महत्वाचे स्थलनिर्देशक शब्द यांचे आद्याक्षर मोठ्या लिपीत असते.
उदाहरणार्थ :
Greek Revolution, World War - I, Golden Era, Middle Age.
१४. मौल्यवान व मानाची बक्षिसे किंवा पदके यांच्या नावाचा आरंभ मोठ्या अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
Param Vir Chakra, Rashtrapati Award, Nobel Prize.
१५. पत्रलेखनातील मायना व शेवट यांच्या शब्दांचे आद्याक्षर मोठ्या लिपीत असते.
उदाहरणार्थ :
Dear Mother, My Dear Father, Dear Sir, Yours Lovingly, With Love, Yours Faithfully.
१६. पुस्तक, मासिके, वर्तमानपत्रे, नाटके, टेलीव्हिजन वरील मालिका, अहवाल इत्यादींची शिर्षके यांचा आरंभ मोठ्या अक्षराने करतात.
उदाहरणार्थ :
The Times of India, Samachar, Nat Samrat, Shri Krishna.
१७. वाक्यामध्ये विसर्गानंतर येणाऱ्या पहिल्या अक्षराचे आद्याक्षर मोठ्या लिपित असते.
उदाहरणार्थ :
Ask your questions : I shall answer them.
Maya : Is there no life on Antarctica?
१८. नातेसंबंध दर्शविणारे शब्दांचे आद्याक्षर मोठ्या लिपीत असते.
उदाहरणार्थ :
I asked Father if Uncle Ganesh was also going.
परंतु नातेसंबंध दर्शविणाऱ्या शब्दांपूर्वी जर पुरुषवाचक सर्वनामांची षष्ठी रुपे (my, his, your, her, therir) वापरली असतील तर नातेदर्शक शब्दांचे आद्याक्षर मोठ्या लिपीत वापरत नाहीत.
उदाहरणार्थ :
I asked my father if Uncle Ganesh was also going.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.