३०. म्हणी : (Idioms / Proverb)
English Grammar in Marathi
३०. म्हणी :
(Idioms / Proverb)
No rose without a thorn : काट्यावाचून गुलाब नाही
A dog in the manger : तुला न मला घाल कुत्र्याला
Tit for tat : जशास तसे
Might is right : बळी तो कान पिळी
To go to the dogs : मसणात जाणे
To kill two birds with one stone : एका दगडात दोन पक्षी मारणे
A finger in pie : एखाद्या गोष्टीची आवड
To feather one's nest : आपल्या पोळीवर तुप ओढणे
A feather in one's cap : विशिष्ट गुणवैशिष्ट्ये
Like father, like son : बाप तसा बेटा
Man proposses and God disposes : मनुष्य qचतिती एक, देव दुसरेच ठरवितो
Lost time is never found again : गेलेला क्षण परत येत नाही
A fish out of water : विचित्र परिस्थिती
Necessity is the mother of invention : गरज ही शोधाची जननी आहे
At arms length : काही अंतरावर
No gain without pains : श्रमविना पैसा नाही
No smoke without fire : अग्निशिवाय धूर नाही. पिकवल्याशिवाय विकत नाही
Sour grapes : कोल्ह्याला दाक्षे आंबट
At random : कोणतेही ध्येय्य नसलेले
Prevention is better than cure : रोग होण्याची आधीच दक्षता घ्यावी
At sixes and sevens : पद्धतशीर नसलेले , सुव्यवस्थित नसलेले
Where there is a will there is a way : इच्छा असली म्हणजे मार्ग सापडतो, इच्छा तेथे मार्ग
A thorn in ones side : एखाद्याचा कोणत्याही एका गोष्टीपासून छळ
A bed of roses : मौजमजा करण्याची स्थिती
Take care of the pence, the pounds will take care of themselves : थेंबेथेंबे तळे साठे
Well begun is half done : कामाचा शुभारंभ म्हणजे निम्मे काम झाल्याची पावतीच
A bad workman quarrels with his tools : नाचता येईना अंगण वाकडे
A drowning man will catch at a straw : बुडत्याला काडीचा आधार
A friend in need is a friend indeed : संकटसमयी मदत करतो तोच खरा मित्र
A painy saved is a painy gained : पैसा व्यर्थ खर्च न करणे म्हणजेच तो मिळविणे होय
A stitch in time saves nine : फाटलेच तर वेळीच टाका घाला म्हणजे पुढचे टाके (परिश्रम) वाचतील
All that glitters is not gold : चकाकते ते सर्वच सोन नसते ( दिसते तसे नसते)
Between two fires : इकडे आड तिकडे विहीर
Barking dogs seldom bite : बोलेल तो करेल काय ( भुंकणारे कुत्री क्वचीतच चावतात)
Birds eye-view : कोणत्याही गोष्टीचा सर्वसाधारण विचार
Empty vessels make such noise : उथळ पाण्याला खळखळाट फार
Birds of a feather : एकाच प्रकारची अथवा स्वभावाची किंवा सवयीची माणसे
Better be alone than any company : कुसंगती पेक्षा एकटे असणे अधिक चांगले
Birds of the same feather flock together : समानशीले व्यसने धुसख्यम्, एकाच माळेचे मणी
Delays are dangerous : आजचे काम उद्यावर टाकू नका
Example is better than precept : आधी केले मग सांगितले
Give an inch and he will take all : भटाला दिली ओसरी अन् भट हातपाय पसरी
Habit is a second nature : सवयीने स्वभाव बनतो
Do not count your chickens before they are hatched : योजना म्हणजे सिद्धी नाही
Give the devils his due : कुकर्म करणाऱ्याच्या सद्गुणांची प्रशंसा केली पहिजे
Honesty is the best poicy : प्रामाणिक पणा हा सद्गुण आहे
If you want a thing well done, do it yourself : जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला
A bird in the hand is worth two in the bush : हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे
A day after the fair : वरातीमागऊन घोडे
A little pot is soon hot : उथळ पाण्याला खळखळाट फार
°A guilty conscience needs no accuser : खाई त्याला खवखवे
A rolling stone gathers no mass : एक ना धड भाराभार qचध्या
A tree is known by its fruit : शितावरुन भाताची परिक्षा
As you sow so you shall reap : पेराल ते उगवेल
Beggars must not be choosers : भिकारी तो भिकारी पर वर मिजास भारी
Better late than never : काहीच न करण्यापेक्षा उशिरा (सुरवात) करणे बरे
To carry coal to new castle : लाखाचे बारा हजार करणे
Early to bed and early to rise makes man healthy, wealthy and wise : लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य, धन चातुर्य लाभे
Every dog has his day : चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
Cat your coat according to your cloth : अंथरुण पाहून पाय पसरा
Half a loaf is better than no bread : काही नसण्यापेक्षा थोडेतरी असणे बरे
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.