७.सर्वनाम : (PRONOUN)
English Grammar in Marathi
७.सर्वनाम :
(PRONOUN)
वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाला प्रतिनाम असेही म्हणतात.
सर्वनामाला वाक्यात स्वतंत्र अर्थ नाही. म्हणजे पूर्वीच्या नामाचा आधार घेऊन संदर्भानेच त्याला अर्थ प्राप्त होतो. वाक्यात निरनिराळया संदर्भात सर्वनामांचा अर्थ बदलतो.
कर्ता किंवा कर्म म्हणून वापरल्या जाणाऱ्या नामाप्रमाणे सर्वनामांचाही वापर होतो.
सर्वनामांमुळे नामाची पुनरावृत्ती टाळता येते. त्याला उपपद लागत नाही.
सर्वनामांचे अनेकवचन नामाप्रमाणे होत नाही.
ज्या नामाऐवजी सर्वनाम वापरलेले असते त्या दोहोंचे (नाम व सर्वनाम यांचे) लिंग, वचन, पुरूष आणि विभक्ती एकच असतात.
सर्वनामाचे प्रकार (Kinds of Pronouns ) :
१.पुरूषवाचक सर्वनामे (Personal Pronoun )
२.दर्शक सर्वनामे (Demonstrative Pronoun )
३.संबंधदर्शक सर्वनामे (Relative Pronoun)
४.प्रश्नार्थक सर्वनामे (Interrogative Pronoun )
५.सामान्य किंवा अनिश्चिततावाचक सर्वनामे (Indefinite Pronoun )
६.परिणामकारी/कर्मवाचक किंवा स्वात्मदर्शक सर्वनामे (Reflexive / Emphatic Pronoun )
७.विभाजक सर्वनामे (Distributive Pronoun )
---------
१.पुरूषवाचक सर्वनामे (Personal Pronoun ) :
बोलणारी किंवा लिहणारी व्यक्ती, ज्याच्याशी बोलते ती व्यक्ती आणि ज्या व्यक्ती विषयी बोलते / बोलतो किंवा लिहतो / लिहते अशा तीनही व्यक्तींसाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यास पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
ही सर्वनामे I, We, You, He, She, It आणि They अशी आहेत. सर्वनामें एकूण मिळूण ७ आहेत परंतु You हे सर्वनाम तु व तुम्ही अशा दोन्ही अर्थाने वाक्यात वापरतात. म्हणून एकूण सर्वनाम ८.
(मराठीत - मी, आम्ही, तु, तुम्ही, तो, ती, ते, त्या)
पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात.
१. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
स्वत: संबंधी बोलताना किवा लिहताना व्यक्ती ज्या सर्वनामांचा वापर करतो त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. I , We (मी, आम्ही) ही दोन प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
उदाहरणार्थ :
I am a Writer.
We are playing.
२. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :
ज्याच्याशी बोलाचे असते त्या व्यक्तींसंबंधी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. You(तू, तुम्ही) हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे हे सर्वनाम तु व तुम्ही अशा दोन्ही अर्थाने वाक्यात वापरतात.
उदाहरणार्थ :
You go. - तु जा
You all go to work. - तुम्ही कामावर जा
३. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
ज्यांच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे असते त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतात त्यांना तृतीयपुरुष वाचक सर्वनाम म्हणतात. He, She, It, They (तो,ती,ते,(ते,त्या,ती)) तीन तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
उदाहरणार्थ :
He is a clever boy.
She is beautiful.
It is a good place.
They are playing.
---------
पुरूषवाचक सर्वनामांची विभक्ती रूपे :
प्रथम पुरषवाचक सर्वनामे :
- एकवचन - अनेकवचन
प्रथमा : I - We
द्वितीया : me - us
तृतीया : my or mine - our or ours
द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे :
प्रथमा : you - you
द्वितीर्या : you - you
तृतीर्र्या : you or yours - you or yours
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
प्रथमा : He - She - It - They
द्वितीया : him - her - it - them
तृतीया : his - her or hers - its - their or theirs
पुरूषवाचक सर्वनामे एकूण आठ असून कोणत्याही वाक्याचा कर्ता या आठमध्ये सामावलेला असतो.
इंग्रजी भाषेत क्रियापद नेहमी कर्ताला अनुसरूनच येते त्यामुळे क्रियापद चालविताना पुरूषवाचक सर्वनामांचा वापर करतात.
प्रथम पुरूषी पुरूषवाचक (I - We ) सर्वनामे बोलणारा स्वत:बद्दल व स्वत:सहित सर्वांबद्दल बोलताना वापरतात.
द्वितीय पुरूषी पुरूषवाचर्क (you - you ) सर्वनामे ज्याच्याशी बोलतो तो एक किंवा अनेक/सर्व यांच्याबद्दल बोलताना वापरतात.
तृतीय पुरूषी पुरूषवाचक (He, She, It, They)सर्वनामे बोलणारा व ज्याच्याशी बोलतो तो यांच्याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती /वस्तू हे एक किंवा अनेक / सर्व यांच्याबद्दल बोलताना वापरतात.
षष्ठी विभक्तीने दोन-दोन रूपे आहेत. ही रूपे स्वामित्वदर्शक विशेषणेही आहेत. म्हणून ती नामाच्या पूर्वी वापरतात.
1. This is my book.
2. His mother turned around.
परंतु mine,ours,yours,his, hers, its, theirs ही रूपे स्वतंत्रपणे वापरली जातात आणि त्यांच्यानंतर नाम येत नाही.
1.This cup belongs to me.
2. It is mine.
ज्या नामाऐवजी पुरूषवाचक सर्वनाम वापरावयाचे त्या नामाचे लिंग, वचन, पुरूष आणि विभक्ती यांच्याशी हे पुरूषवाचक सर्वनाम अनुरूप असावे.
वाक्याचा कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो. म्हणून कर्ताऐवजी प्रथमा विभक्तीची रूपे वापरतात.
कर्म द्वितीया विभक्तीमध्ये असते म्हणून कर्माऐवजी द्वितीया विभक्तीची रूपे वापरतात.
तृतीय पुरूषी एकवचनी पुरूषवाचक सर्वनामे वापरताना पुलिं्लगी He, स्त्रीलिंगी She आणि नपुंसकलिंगी It असा वापर करतात.
It चा उपयोग निर्जीव वस्तू, प्राणी, वेळ किवां लिंग स्पष्ट नसणारा शब्द यासाठी करतात.
समुदायवाचक नामाचा वापर केवळ एक समुदाय अशा अर्थाने केला असेल तर त्याऐवजी It वापरतात.
तात्पुरता कर्ता म्हणून to be या क्रियापदाच्या रूपापूर्वी विशिष्ट प्रकारची रचना करण्याकरितादेखील It चा वापर करतात.
It is better to get up early in the morning.
It ची षष्ठी विभक्ती Its अशी आहे. Its आणि It's यामध्ये फरक आहे. It's म्हणजे It is.
मात्र and ने जोडलेल्या दोन नामांमधून एकाच व्यक्तीचा बोध होत असेल तर एकवचनी पुरूषवाचक सर्वनामाचा वापर करतात.
And ने जोडलेल्या दोन एकवचनी नामापूर्वी जर each किंवा every वापरलेले असेल तर एकवचनी पुरूषवाचक सर्वनामाचा वापर करतात.
दोन एकवचनी नामे or, either.... or, neither... nor यांनी जोडलेली असतील तर एकवचनी पुरूषवाचक सर्वनामाचा वापर करतात.
And ने जोडलेल्या दोन नामांपैकी एक नाम अनेकवचनी असेल आणि दुसरे नाम एकवचनी असेल तर अनेकवचनी सर्वनामाचा वापर करतात.
सामान्यत: I या पुरूषवाचक सर्वनामाचा उपयोग खालीलप्रमाणे करतात :
He, you and I
You and I
He and I
----------
२.दर्शक सर्वनामे (Demonstrative Pronoun ) :
ज्या सर्वनामांनी जवळची किंवा दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखविली जाते त्या सर्वनामांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात.
(मराठीत - जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती साठी - हा, ही, हे आणी दूरच्या वस्तू किंवा व्यक्ती साठी - तो, ती, ते)
उदाहरणार्थ :
This, That, These, Those, Such, Such as
This आणि That एकवचनी.
These आणि Those अनेकवचनी
This चे अनेकवचन These
That चे अनेकवचन Those
This आणि These जवळच्या वस्तू/ व्यक्त दाखविण्यासाठी, That आणि Those दूरच्या/ काही अंतरावरील व्यक्ती/ वस्तू दर्शविण्यासाठी वापरतात.
यापैकी प्रत्येक सर्वनाम तिन्ही लिंगामध्ये वापरतात.
दर्शक सर्वनामानंतर लगेच नाम येत नाही.
दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यात फरक आहे.
दर्शक सर्वनामापुढे नाम आल्यास ते दर्शक विशेषण समजले जाते.
उदाहरणार्थ :
This is a book.(दर्शक सर्वनाम)
This book is very interesting.(दर्शक विशेषण)
---------
३.संबंधदर्शक सर्वनामे (Relative Pronoun) :
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
संबंधदर्शक सर्वनामाच्या साहाय्याने दोन वाक्ये जोडता येतात. पहिल्या वाक्यातील नामाऐवजी दुसऱ्या वाक्यात अशा प्रकारचे सर्वनाम येते.
(मराठीत - जो, जी, जे, ज्या)
उदाहरणार्थ :
I want to meet my friend who works in this school.
या वाक्यात who हे सर्वनाम friend या नामाऐवजी वापरलेले आहे आणि त्याचबरोबर who ने दोन्ही वाक्ये जोडली आहेत. म्हणून who हे संबंधी सर्वनाम व उभयान्वयी अव्यय अशी दोन प्रकारची कामे करते.
संबंधदर्शक सर्वनामाचा उपयोग ज्या नामाऐवजी केलेला असतो त्यास सर्वनामाचे पूर्वगामी (Antecedent ) असे म्हणतात. वरील वाक्यात who चे पूर्वगामी friend आहे.
काही संबंधदर्शक सर्वनामे :
Who, whom, whose, what, which, as, but, whoever, whatever, that, whichever, whosoever, whatsoever.
संबंधदर्शक सर्वनाम हे सर्वनाम आणि उभयान्वयी अव्यय अशी दोन्ही कामे करते.
संबंधदर्शक सर्वनामाची एकवचनी / अनेकवचनी किंवा पुलिं्लगी / स्त्रीलिंगी अशी रूपे नाहीत.
कधी-कधी संबंधी सर्वनाम वगळतात. प्रामुख्याने संभाषणात तर हे अधिक प्रमाणात घडते.
परंतु संबंधदर्शक सर्वनाम हे गौणवाक्यामध्ये (अधीन, कमीप्रतीचा) ( Subordinate clause मध्ये) जेव्हा त्या वाक्याचा कर्ता म्हणून आलेले असते तेव्हा ते सर्वनाम वगळता येत नाही.
संबंधदर्शक सर्वनाम शक्यतो पूर्वगामी नामाच्या जवळपासच वापरतात.
संबंधदर्शक सर्वनाम जेव्हा गौण वाक्यात कर्ता म्हणूनही असते तेव्हा त्याच्यासाठी वापरले जाणारे क्रियापद पूर्वगामी नामाच्या वचन व पुरूषप्रमाणे असते.
Who फक्त व्यक्तीसाठी
What फक्त वस्तूसाठी
Which निर्जीव वस्तू व प्राणी यासाठी आणि
That व्यक्ती व वस्तू यासाठी वापरतात.
षष्ठी विभक्तीत who चे Whichआणि Of which चे असे वापरतात.
आणि शब्दयोगी अव्ययाबरोबर - of whom, to whom, by which अशी वापरतात.
मात्र that याप्रमाणे वापरता येता नाही.
--------
४.प्रश्नार्थक सर्वनामे (Interrogative Pronoun ) :
ज्या सर्वनामांचा वापर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.
प्रश्नार्थक सर्वनामे :
What - व्हॉट - काय
Where - व्हेअर - कोठे
When - व्हेन - केव्हा
Why - व्हाय - का
Who - हू - कोण
Whom - हूम - कोणाला
Whose - हूज - कोणाचा
How - हाऊ - कसा
How many - हाऊ मेनी - किती (संख्येत मोजता येणारे)
How much - हाऊ मच - किती (संख्येत मोजता न येणारे)
How far - हाऊ फार - किती दूर (अंतर)
How long- हाऊ लाँग - किती काळ (वेळ)
Of whom - ऑफ हूम - कोणाबद्दल
To whom - टू हूम - कोणाला किंवा कोणाशी
With whom - विथ हूम - कोणाबरोबर किंवा कोणासह
Whatever - व्हॉटएव्हर - काहीही
Whoever - हूएव्हर - कोणीही
Whichever - विचएव्हर - कोणतेही
Who हे व्यक्तीसाठी वापरतात.
What हे व्यक्ती व वस्तू या दान्हींसाठी वापरतात.
Who ची वेगवेगळी विभक्ती रूपे आहेत. तशी What किंवा Which यांची नाहीत.
Who प्रथम विभक्ती Whom द्वितीया विभक्ती Whose षष्ठी विभक्ती
व्यक्तीचा व्यवसाय किंवा नोकरीधंदा विचारण्यासाठी What वापरतात.
What is he ? - He is a teacher.
आणि नाव किंवा कौटुंबिक संबंध विचारण्यासाठी Who वापरतात.
Who is he ? - he is Mr.Joshi
प्रश्नार्थक वाक्य तयार करताना साहाय्यकारी क्रियापद (प्रामुख्याने do) वापरावे लागते. परंतु who च्या कर्तासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे क्रियापद तसेच येते.
Who won the match ? - We won the match.
Which आणि What चा उपयोग प्रश्नार्थक विशेषणे म्हणूनही करतात.
Which book will you take ?
What games have you played ?
----------
५.सामान्य किंवा अनिश्चिततावाचक सर्वनामे (Indefinite Pronoun ) :
कोण, काय या शब्दाचा वापर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणाबद्दल वापरली हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला सामान्य किवा अनिश्चिततावाचक सर्वनामे म्हणतात.
या प्रकारची सर्वनामे निश्चत व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करीत नाहीत. नामांचा सामान्यपणे उल्लेख किंवा सर्वसाधारण अर्थानेच निर्देश करतात. स्पष्टपणे नामाची जागा घेत नाहीत. सूचित केलेल्या नामाचा उल्लेख करतात.
उदाहरणार्थ :
All were happy. Some are born great.
अशा प्रकारची इतर काही सर्वनामे -
One - एक
none - काहीही नाही
nobody - कोणीही नाही
nothing - काहीही नाही
some - काही
somebody - कोणीतरी
someone - कोणीतरी
something - काहीतरी
anyone - कोणीही
anybody - कोणीही
anything - काहीही
anyother - इतर कोणतेही
all - सर्व किंवा सारे
many - अनेक, पुष्कळ
others - इतर
everybody - प्रत्येकजण
everyone - प्रत्येकजण
several - अनेक (तीन किंवा तीनपेक्षा जास्त) कित्येक, बरेच
both - दोन्ही, दोघे मिळून एकत्र
a few - काही.
Both, a few, several, many, some, some others ही सर्वनामे नेहमी अनेकवचनी असतात.
Some boys are late.
दर्शक सर्वनामाप्रमाणेच या प्रकारच्या सर्वनामांचाही विशेषण म्हणून उपयोग केला जातो.
-----------
६.कर्मकर्तावाचक / परिणामकारी / प्राधान्यदर्शक सर्वनामे (Reflexive / Emphatic Pronoun ) :
ज्या सर्वनामांनी वाक्यातील कर्ताच्या (नाम किंवा सर्वनाम) कृतीवर जोर देण्यासाठी वापरली जाणारी रुपे यांना कर्मकर्तावाचक / परिणामकारी / प्राधान्यदर्शक सर्वनामे असे म्हणतात.
अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व कर्म ही एकच व्यक्ती असते. हे सर्वनाम क्रियापदाचे किंवा शब्दयोगी अव्ययाचे कर्म असते आणि क्रियापदानंतर वापरले जाते.
उदाहरणार्थ :
1. I fell down and hurt myself.
2. She cannot dress herself.
या प्रकारची सर्वनामाची रूपे पुरुषवाचक सर्वनामाच्या षष्ठी विभक्तीच्या रूपांना self / selves जोडून ही संमिश्र स्वरूपाची रूपे बनतात.
या प्रकारच्या सर्वनामांचा उपयोग जेव्हा एकटयानेच अशा अर्थाला प्राधान्य देण्यासाठी, त्यावर अधिक जोर देण्यासाठी केला जातो तेव्हा त्यांना प्राधान्यदर्शक Emphatic Pronoun असे म्हणतात. ही सर्वनामे कर्तालाच अधिक प्राधान्य देतात. आणि कर्तानंतर वापरली जातात. वाक्यात कर्म आल्यास कधी-कधी कर्मानंतरही वापरतात.
उदाहरणार्थ :
1.I myself said so.
2.He himself solved the problem.
परिणाम दाखविण्यासाठी किंवा जोर देऊन क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरतात.
बहूधा क्रियापदानंतर कर्मकर्तावाचक Reflexive Pronoun आणि कर्तानंतर Emphatic Pronoun वापरतात.
या सर्वनामांचा उपयोग वाक्यात कर्ता म्हणून करीत नाहीत.
----------
७.विभाजक सर्वनामे (Distributive Pronoun ) :
ज्या सर्वनामामुळे एका वेळी एकच व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश केला जातो किंवा तसा बोध होतो त्यां सर्वनामांना विभाजक सर्वनामे असे म्हणतात. यामुळेच ती नेहमी एकवचनीच असतात. आणि त्यांचे क्रियापदही एकवचनीच असते.
उदाहरणार्थ :
Each of the boys was writing.
Each म्हणजे अनेकांपैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे.
काही विभाजक सर्वनामे :
each - प्रत्येक
either - दोहों पैकी एक
neither - दोहोंपैकी कोणताही नाही
any - कोणताही, काही अंशी
anyone - कोणीही
no one - कोणीही नाही
none - नाही
everybody - प्रत्येकजण
everyone - प्रत्येकजण
everything - सर्वकाही
anything - काहीही
nothing - काहीही नाही
each other - एकमेकांना
one another - एकमेकांना.
अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे - [ Each ]
दोन व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी एक जण किंवा दुसरा - [ Either ]
दोन व्यक्ती किंवा वस्तू यांपैकी हाही नाही आणि तोही नाही - [ Neither ]
अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एक जण - [Any, anyone, anything]
अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांपैकी कोणताही एकही जण नाही अशा अर्थी - [ No one, none, nothing, nobody ]
अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांपैकी प्रत्येक जण - [ Everyone, everything, everybody ]
विभाजक सर्वनाम आणि विभाजक विशेषण यामध्ये फरक आहे. विभाजक सर्वनामांचा उपयोग विभाजक विशेषण म्हणूनही करतात.
उदाहरणार्थ :
Each boy gets a book.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.