६. वचन : (NUMBER)
English Grammar in Marathi
६. वचन :
(NUMBER)
नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो गुण किंवा धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात.
मराठीमध्ये ज्याप्रमाणे नामाचे एकवचन आणि अनेकवचन होते त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेतसुध्दा सामान्य नाम आणि समुदायवाचक नाम यांचे एकवचन आणि अनेकवचन होते. बोलताना एक व्यक्ती किंवा वस्तूविषयी की अनेक व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल बोलतो हे स्पष्ट करावेच लागते. कारण त्याप्रमाणे क्रियापदाचा वापर करावा लागतो.
वचनाचे दोन प्रकार आहेत.
१)एकवचन (Singular Number) :
नामाच्या रुपावरुन ज्यावेळेस एक व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा बोध होतो तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Book, Boy, Mango.
२) अनेकवचन (Plural Number) :
नामाच्या रुपावरुन ज्यावेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा होतो तेव्हा त्यास अनेकवचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Books, Boys, Mangoes.
अनेकांपैकी एक (One of the) अशी रचना करतानासुध्दा त्या पुढे अनेकवचन येते.
एकवचनी नामासाठी एकवचनी क्रियापद वापरतात.
अनेकवचनी नामासाठी अनेकवचनी क्रियापद वापरतात.
अनेकांच्या पैकी एक अशी रचना करताना त्यापुढे अनेकवचन वापरतात.
एकवचनी नामाचे अनेकवचन तयार करण्याच्या अनेक पध्दती/ नियम खालीलप्रमाणे :
१. बहुतेक एकवचनी नामाला ी हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन तयार होते.
उदाहरणार्थ :
एकवचन - अनेकवचन
Pen - Pens
Hand - Hands
२.नामाच्या शेवटी y असून त्यापूर्वी एखादा स्वर (a,e,i,o,u ) येत असेल तर त्या नामाचे अनेकवचनसुध्दा s हा प्रत्यय जोडून तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Boy - Boys
Key - Keys
Day - Days
३.मात्र नामाच्या शेवटी y असून त्यापूर्वी व्यंजन असेल (म्हणजे स्वर नसेल ) तर त्या y चा लोप होतो आणि y च्या जागी ies हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Baby - Babies
Story - Stories
City - Cities
४.ज्या नामाच्या शेवटी s, sh, ch, ss, x, z यांपैकी अक्षर येत असेल तर es हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Bus - Buses
Class - Classes
Dish - Dishes
Bench - Benches
Box - Boxes
५.नामाच्या शेवटी o असून त्यापूर्वी व्यंजन असेल तर es हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Hero - Heroes
Potato - Potatoes
Buffalo - Buffaloes
काही अपवाद:
Photo - Photos
Piano - Pianos
Kilo - Kilos
Dynamo - Dynamos
६.मात्र नामाच्या शेवटी o असून त्यापूर्वी स्वर असेल तर फक्त s हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Radio - Radios
Cuckoo - Cuckoos
Studio - Studios
७.नामाच्या शेवटी f, fe ही अक्षरे असल्यास f, fe काढूून टाकून त्यांच्या जार्गी ves ही अक्षरे घालून त्या नामांचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Leaf - Leaves
Wife - wives
Shelf - Shelves
८.परंतु नामाच्या शेवटी f, fe असूनसुध्दा फक्त जोडून अनेकवचने होणारी नामे (म्हणजे वरील नियमास अपवाद असणारी नामे.)
एकवचन - अनेकवचन
Roof - Roofs
Safe - safes
Chief - Chiefs
Cliff - Cliffs
Handkerchief - Handkerchiefs
९.नामातील स्वरात बदल करून काही नामांचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Man - Men
Foot - Feet
१०.स्वरात बदल होऊन en हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन तयार होते.
एकवचन - अनेकवचन
Child - Children
Ox - Oxen
Kit - Kitten
११.नामाच्या शेवटी man हा शब्द असेल तर त्याचे अनेकवचन man च्या ऐवजी men वापरून बनते.
एकवचन - अनेकवचन
Postman - Postmen
Milkman - Milkman
Gentleman - Gentlemen
१२.काही नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच (एकच) असतात.
एकवचन - अनेकवचन
Sheep - Sheep
Deer - Deer
Swine - Swine
१३.काही नामे मोजण्यासाठी वापरली जातात व त्यामुळे नेहमी अनेक वचनातच वापरतात. कोणताही प्रत्यय लागत नाही.
Dozen, Hundred, Pair
१४.काही नामे अनेकवचनीच आढळतात व अनेकवचनीच वापरतात.
Trousers, Scissors, Measles
१५.अनेकवचनी दिसत असली तरी प्रत्यक्षात वापर एकवचनीच असतो अशी नामे.
Mathematics, News, Gallows
१६.काही समुदायवाचक नामे एकवचनी दिसत असली तरी नेहमी अनेकवचनातच वापरतात.
Cattle , People , Poultry
१७.काही समुदायवाचक व इतर नामे नेहमी एकवचनीच वापरतात.
Information , Furniture, Luggage
१८.सामासिक शब्दांचे अनेकवचन करताना बहुधा प्रमुख शब्दास जोडतात.
एकवचन - अनेकवचन
Brother-in-law - Brothers-in-law
Passer- by - Passers-by
Looker-on - Lookers- on
परंतु काही अपवाद :
Bedroom - Bedrooms
Bookcase - Bookcases
Toothpick - Toothpicks
१९.संक्षिप्त रूपाचे अनेकवचन पूर्णविरामानंतर s प्रत्यय जोडून करतात.
एकवचन - अनेकवचन
M.P. - M.P.s
M.L.A. - M.L.A.s
M.D. - M.D.s
२०.वर्णमालेतील एका अक्षराचे अनेकवचन करताना अॅपॉस्ट्रोफी चिन्हानंतर s जोडतात.
एकवचन - अनेकवचन
A - As
P - Ps
t - ts
२१.नामाच्या शेवटी ful असेल तर अनेकवचन s जोडून करतात.
एकवचन - अनेकवचन
Handful - Handfuls
Spoonful - Spoonfuls
Mouthful - Mouthfuls
२२. hair नेहमी एकवचनीच वापरतात.
My hair is black.
परंतु hair (केश) जर मोजता येत असतील तरच त्यांचे अनेकवचन hairs करतात.
२३.एकवचनी रूपात एक अर्थ आणि अनेकवचन केले तर निराळाच अर्थ, अशी भिन्न अर्थ असणारी नामे-
एकवचन - अनेकवचन
Good (चांगला) - Goods (माल)
Force (ताकद) - Forces (सैन्यदल)
Iron (लोंखड ) - Irons (पायबेडया)
२४.काही नामांच्या अनेकवचनाची दोन रूपे होतात, पंरतु त्या दोहोंचेही अर्थ भिन्न असतात.
Index - Indexes - अनुक्रमणिका Indices - बीजगणितातील एक संज्ञा
२५.काही नामांचे एकवचनात दोन अर्थ असतात, परंतु अनेकवचनात फक्त एकाचाच वापर होतो.
Light - १.दिवा २.प्रकाश किरण.
Lights - दिवे
२६.काही नामांचा एकवचनात अर्थ एक तर अनेकवचनात दुसरेच/ निराळेच दोन अर्थ.
Custom सवय : १.Customs चालीरीती २.Customs आयातकर
काही अनेकवचने :
एकवचन - अनेकवचन
Singular Number - Plural Number
I - We
you - you
he - they
she - they
it - they
is - are
this - these
that - those
was - were
lady - ladies
century - centuries
dictionary - dictionaries
toy - toys
monkey - monkeys
donkey - donkeys
holiday - holidays
ray - rays
story - stories
banana - bananas
mango - mangoes
paisa - paise
shoe - shoes
tomato - tomatoes
rupee - rupees
echo - echoes
bush - bushes
radio - radios
branch - branches
cuckoo - cuckoos
batch - batches
thief - thieves
watch - watches
calf - calves
gas - gases
wolf - wolves
brush - brushes
half - halves
fox - foxes
scarf - scarfs
bench - benches
belief - beliefs
address - addresses
grief - griefs
bus - buses
woman - women
fly - flies
tooth - teeth
country - countries
goose - geese
lorry - lorries
horseman - horsemen
family - families
washer-man - washer-men
puppy - puppies
policeman - policemen
colony - colonies.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.