५. लिंग : (GENDER)
English Grammar in Marathi
५. लिंग :
(GENDER)
नामाच्या रुपावरुन एखादी वस्तू किंवा प्राणी पुरुष जातीचे आहे की स्त्रीजातीची आहे, की या दोन्हींपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरुन कळते त्यास लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेप्रमाणेच इंग्रजी भाषेतही स्त्री-पुरूषदर्शक लिंगभेद आहेत. लिंगाचा व्याकरणदृष्टीने संबंध फक्त नामाशी असतो. नामाच्या इतर कोणत्याही रूपाशी-वचन, विभक्ती इत्यादींशी लिंगाचा संबंध नाही.
प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असते.
निर्जिव वस्तुंचे लिंग हे काल्पनिक असते.
लिंग हे नामाच्या रुपावरुन ओळखले जाते.
इंग्रजीमध्ये ही लिंगाचे चार प्रकार आहेत.
१.पुल्लिंग (Masculine Gender ):
ज्या नामावरुन पुरुष किंवा नरजातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
तो या सर्वनामाचा वापर पुल्लिंग शब्दासाठी केला जातो.
उदाहरणार्थ :
he, man, boy,father, king, poet, hero, bull.
२. स्त्रीलिंग (Feminine Gender ):
ज्या नामावरुन स्त्री किंवा मादी जातीचा बोध होता त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
ती या सर्वनामाचा वापर स्त्रीलिंग शब्दासाठी केला जातो.
उदाहरणार्थ :
she, woman,girl, mother,cow, heroine.
३.सामान्य लिंग ( Common Gender ):
ज्या नामांमध्ये स्त्री-पुरुष भेद असूनही ती दोहोंसाठी वापरीली जातात त्या नामांना सामान्य लिंगी किंवा उभयलिंगी असे म्हणतात. अशा नामांचे लिंग संदर्भावरूनच स्पष्ट होते.
उदाहरणार्थ :
child, teacher, person, pupil, orphan, thief, neighbour, baby, friend, cook, dancer, painter, student, calf.
४.नपुंसकलिंग (Neuter Gender ):
ज्या नामावरुन पुरुष किंवा स्त्री या कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
ते या सर्वनामाचा वापर नपुंसगलिंग शब्दासाठी केला जातो. सामान्यत: निर्जीव वस्तू नपुंसकलिंगी मानतात किंवा समजतात.
उदाहरणार्थ :
pen, book, cap, chair, river, table.
सामान्यत: पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे खालीलप्रमाणे:
१.पुल्लिंगी नामाबद्दल स्वतंत्र शब्द वापरून स्त्रीलिंगी खालीलप्रमाणे :
पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
Boy - Girl
Man - Woman
Father - Mother
Husband - Wife
King - Queen
Sir - Madam
२.पुल्लिंगी नामास - ess हा प्रत्यय जोडून स्त्रीलिंगी खालीलप्रमाणे :
पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
Lion - Lioness
Poet - Poetess
Host - Hostess
Author - Authoress
३.मुळच्या पुल्लिंगी नामांमध्ये काही फरक / बदल करून नंतर - ess हा प्रत्यय जोडून स्त्रीलिंगी खालीलप्रमाणे :
पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
Actor- Actress
God -Goddess
Waiter - Waitress
Tiger - Tigress
Master - Mistress
Inspector - Inspectress
४.नामाच्या सुरवातीला किंवा शेवटी लिंगभेद दर्शविणारा शब्द जोडून स्त्रीलिंगी खालीलप्रमाणे :
पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
He goat - She goat
Milk man - Milk maid
Pea cock - Pea hen
Grand father- Grand mother
Landlord - Landlady
Washerman - Washerwoman
५.काही नामांची स्त्रीलिंगी रूपे अनियमित असतात. ती खालीलप्रमाणे :
पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
Hero - heroine
Bridegroom - bride
Dog- bitch
Mister -miss
Fox - vixen
Lad- lass
Uncle - Aunt
६.सजीव प्राण्यांचा समूहा दर्शविणारी नामे (Collective nouns ) नपुंसक लिंगी असतात.
उदाहरणार्थ:
class, army, committee
The committee gave its decision.
वरील वाक्यामध्ये committee या शब्दासाठी its हे नपुंसक लिंगी सर्वनाम वापरले आहे.
७.लहान मुले, क्षुद्र प्राणी दर्शविणारी नामे नपुंसक लिंगी असतात.
उदाहरणार्थ:
ant, child,bird, fly, baby
It is a baby.
It is an ant.
वरील वाक्यामध्ये baby, ant या शब्दासाठी it हे नपुंसक लिंगी सर्वनाम वापरले आहे.
८.निर्जीव वस्तू पुष्कळदा सजीवाच्या भूमिकेतून वापरतात तेव्हा त्याच्याबद्दल पुलिं्लगी / स्त्रीलिंगी सर्वनामे वापरतात. तसेच सामाथ्र्याचे वा शक्तीचे किंवा हिंसेचे वा कू्ररतेचे प्रतीक म्हणून वापरले जाणारे शब्द पुलिं्लगी समजतात.
उदाहरणार्थ :
sun,time, death, winter, summer.
The sun gives his light to all.
वरील वाक्यामध्ये Sun या शब्दासाठी his हे पुल्लिंगी सर्वनाम वापरले आहे.
९.सौंदर्य, सभ्यता किंवा आकर्षकता दर्शविणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी समजतात.
उदाहरणार्थ :
moon, nature, peace, spring, autumn, justice, mercy,hope, charity.
The moon spreads her pleasant rays at night.
वरील वाक्यामध्ये moon या शब्दासाठी her हे स्त्रीलिंगी सर्वनाम वापरले आहे.
१०. काही शब्दांसाठी वाक्यामध्ये स्त्रीलिंगी असतात व त्यासाठी स्त्रीलिंगी सर्वनाम वापरतात.
उदाहरणार्थ :
Ship आणि Car
The Darya Daulat is a ship. Her colour is white.
वरील वाक्यामध्ये ship या शब्दासाठी her हे स्त्रीलिंगी सर्वनाम वापरले आहे.
काही स्त्रीलिंगी रूपे :
पुल्लिंगी - स्त्रीलिंगी :
Masculine - Feminine
actor - actress
hunter - huntress
ambassador - ambassadress
husband - wife
auditor - auditress
inspector - inspectress
benefactor - benefactress
instructor - instructress
boy - girl
king - queen
bridegroom - bride
lad - lass
brother - sister
land-lord - land-lady
bull - cow
bullock - cow
lion - lioness
cock - hen
lord - lady
cock-sparrow - hen-sparrow
man - woman
conductor - conductress
man-servant - maid-servant
czar - czarina
master - mistress
director - directress
mayor - mayoress
dog - bitch
milkman - milkmaid
editor - editress
monk - nun
elector - electress
nephew - niece
emperor - empress
pappa - mamma
father - mother
poet - poetess
founder - foundress
prince - princess
fox - vixen
shepherd - shepherdess
gentleman - lady
songster - songstress
god - goddess
sir - madam
grandfather - grandmother
son - daughter
he-ass - she-ass
sultan - sultana
he-bear - she-bear
tiger - tigress
he-goat - she-goat
uncle - aunt
heir - heiress
washerman - washerwoman
hero - heroine
widower - widow
horse - mare
wizard - witch
host - hostess.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.