४. नाम : (NOUN)
English Grammar in Marathi
४. नाम :
(NOUN)
वास्तविक किंवा काल्पनिक जगतातील कोणत्याही व्यक्तीचे, प्राण्याचे, ठिकाणाचे, वस्तुचे, पदार्थाचे, कल्पनेचे, भावनेचे, गुणाचे,गुणधर्माचे किंवा इतर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. ज्या वस्तू किंवा पदार्थ आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा ज्यांची आपण कल्पना करू शकतो किंवा जाणू शकतो अशा सर्व वस्तू किंवा पदार्थ नाम या शब्दाच्या संकल्पनेमध्ये येतात.
उदाहरणार्थ :
God - गॉड - देव, Kedar - केदार, Mumbai - मुंबई , Boy - बॉय - मुलगा, Book - बुक - पुस्तक, Milk - मिल्क - दुध, Class - क्लास - वर्ग, प्रकार , Kindness - कांर्इंडनेस - दया, दयाळुपणा, Childhood - चाईल्डहुड - बालपण. इत्यादी.
नामाचे प्रकार :
(KINDS OF NOUNS) :
नामाचे मुख्य तीन प्रकार एकूण पाच प्रकार आहेत.
१. सामान्य नाम (Common Noun)
सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.
२. समुदायवाचक नाम (Collective Noun)
३.पदार्थवाचक नाम (Material Noun )
४. विशेष नाम (Proper Noun)
५. भाववाचक नाम (Abstract Noun )
----------
१.सामान्य नाम :
( Common Noun )
एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, ठिकाणे किंवा पदार्थ यांना समान गुणधर्मामुळे सर्वसामान्यपणे जे नाव दिले जाते किंवा त्यांच्यासाठी जो शब्द वापरतात त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Hill, House, Boy, girl, book, man, cow, river, village, flower. etc
सामान्य नामाचे अनेक वचन करता येते. सामान्य नामांच्या एकवचनी रूपांपूर्वी a, an, the यापैकी उपपदाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
a pen, an egg, the table.
सामान्य नाम हे जातीवाचक असते.
काही विशेष नामेदेखील सामान्य नामासारखी वापरली जातात.
----------
२.समुदायवाचक नाम :
(Collective Noun)
एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या एकाच शब्दाने केला जातो, थोडक्यात एखाद्या समुहाला दिलेल्या नावास समुदायवाचक नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Crowd म्हणजे लोकांचा समुदाय.
इतर उदाहरणे :
School, Class, Team, Family, People, Army.
समुदायवाचक नाम हे सामान्यत: एकवचनीच वापरतात. त्या वेळी संपूर्ण समुदाय असा त्याचा अर्थ असतो.
सामान्यत: अशा नामांचे क्रियापद एकवचनीच असते.
परंतु काही समुच्चयवाचक नामे नेहमीच अनेकवचनी वापरली जातात.
उदाहरणार्थ :
Cattle, people, poultry.
---------
३.पदार्थवाचक नाम :
(Material Noun)
ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर विविध वस्तू/ पदार्थ बनविल्या जातात व सामान्यत: जे पदार्थ संख्येच्या स्वरूपात मोजता येत नाहीत, अशा मूळ पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या नावास पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ:
Milk, Water, gold, Silver, oil, gas, wood, air, glass, ink, tea, toothpaste.
पदार्थवाचक नामे मोजता न येणारी नामे (Uncontable nouns ) आहेत. एक, दोन, तीन ...... अशा संख्यांनी ती मोजता येत नाहीत.
पदार्थवाचक नामापूर्वी a किंवा an ही उपपदे वापरीत नाहीत. परंतु the हे उपपद कधी- कधी येते.
या नामांच्या एकवचनी रूपांपूर्वी some, any, more अशा प्रकारचे परिमाणदर्शक शब्द वापरले जातात.
उदाहरणार्थ :
some milk, more money, enough time.
मात्र परिमाणाची सादने वापरून या नामांचा मोजता येणाऱ्या नामासारखा उपयोग करता येतो.
उदाहरणार्थ :
a cup of tea, a glass of water, a bottle of ink
पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
काही पदार्थवाचक नामे सामान्य नामे म्हणून वापरली जातात. मात्र त्या वेळी त्यांचा अर्थ वेगळा असतो.
----------
४.विशेष नाम :
(Proper Noun)
एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, ठिकाणाला, प्राण्याला, देशाला, नदीच्या, किंवा वस्तूला दिलेल्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Nashik, Mumbai, India, Japan, Sunday, Diwali, Ganga, Sharad etc.
विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते.
विशेष नामाचे आद्याक्षर नेहमी मोठया लिपीत असते.
विशेष नामाचे अनेकवचन करता येत नाही.
विशेष नामाच्या शेवटी येणारे a हे मुळाक्षर कधी वापरतात तर कधी वापरत नाहीत.
उदाहरणार्थ :
Ram / Rama.
काही विशेष नामांचे स्पेलिंग स्वतंत्रपणे वेगळेच असते.
विशेष नामापूर्वी उपपद ( a, an किंवा the) वापरीत नाहीत. परंतु जर विशेष नामापूर्वी the हे उपपद वापरलेले असेल तर त्या विशेष नामाचा अर्थ/ उपयोग नेहमीपेक्षा वेगळा असतो. म्हणजेच अशी विशेष नामे सामान्य नाम किंवा विशेषण किंवा इतर वेगळ्या अर्थाने वापरलेली असतात.
विशेष नामांचे स्पेलिंग खालील प्रमाणे बनविता येते :
क - k (K), ख - kh (KH), ग - g (G), घ - gh (GH), ङ - n (N), च - ch (CH), छ - chh (CHH), ज - j (J), झ - jh (JH) or z (Z), त्र - n (N) or tra (TRA) , ट - t (T), ठ - th (TH), ड - d (D), ढ - dh (DH), ण - n (N), त - t (T), थ - th (TH), द - d (D), ध - dh (DH), न - n (N), प - p (P), फ - f (F) or ph (PH), ब - b (B), भ - bh (BH), म - m (M), य - y (Y), र - r (R), ल - l (L), व - v (V) or w (W), श - sh (SH), ष - sh (SH), स - s (S), ह - h (H), ळ - l (L), क्ष - ksh (KSH), ज्ञ - dny (DNY).
अक्षरांना वेलांटी, काना, मात्रा इत्यादी जोडताना जसे मराठीत स्वर वापरले जातात तसेच खालील प्रमाणे जोडता येतात.
अ - a (A), आ - a (A), इ - i (I), ई - i (I) or ee (EE), उ - u (U), ऊ - u (U) or oo (OO), ए - e (E), ऐ - ai (AI), ओ - o (O), औ - au (AU) or ou (OU), अं - m (M) or n (N), अ: - ah (AH).
---------
५.भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम:
( Abstact Noun )
जिला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, विचार करू शकतो किंवा जाणवू शकतो अशा स्थितीच्या, वृत्तीच्या, गुणाच्या,गुणधर्माच्या, भावनेच्या, कल्पनेच्या, क्रियेच्या किंवा विचारपध्दतीच्या किंवा वस्तूच्या नावास भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम मूळच्या नामापासून स्वतंत्रपणे वेगळे करता येणे शक्य असते. म्हणजे आपल्याला दिसत नाही, परंतु इतर ज्ञानेंद्रियांना ते कळते. भौतिक अस्तित्व जाणवले नाही तरी पण आपण या प्रकारच्या नामांचा विचार करू शकतो.
उदाहरणार्थ :
sleep, kindness, bravery, truth, beauty, courage, wisdom, childhood, laughter.
Kind man यामध्ये man पासून त्याचा ज्ञळपवपशीी वेगळा आहे.
सामान्यत: भाववाचक नामाचे खालीलप्रमाणे गट पाडता येतील:
गुणदर्शक (Quality ) - wisdom, loyalty, courage.
स्थितिदर्शक (State ) - childhood, freedom, poverty.
कृतिदर्शक (Action ) - movement, laughter, theft.
भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही.
भाववाचक नामापूर्वी सहसा कोणतेही उपपद वापरीत नाहीत.
भाववाचक नामाचा उपयोग सर्वसाधारण अर्थाने केला तर हे उपपद येणार नाही परंतु विशिष्ट अर्थाने वापरल्यास उपपद येईल.
उदाहरणार्थ :
धैर्य एक चांगली गुणवत्ता आहे.
Courage is a good quality.
रमेश याचे धैर्य मोठे होते.
The courage of Ramesh was great.
काही सामान्य नामाची भाववाचक नामे पुढील प्रमाणे :
सामान्य नाम - भाववाचक नाम
Hero - Heroism
Mother - Motherhood
Friend - Friendship
Child - Childhood
Agent - Agency
Boy - Boyhood
काही विशेषणांची भाववाचक नामे पुढील प्रमाणे :
विशेषण - भाववाचक नाम
Honest - Honesty
Great - Greatness
True - Truth
Wide - Width
Kind - Kindness
Deep - Depth
Short - Shortage
High - Height
काही क्रियापदांची भाववाचक नामे पुढील प्रमाणे :
क्रियापद - भाववाचक नाम
Agree - Agreement
Obey - Obedience
Die - Death
Think - Thought
Fail - Failure
Depart - Department
Admin - Admission
Punish - Punishment.
----------
गणनीय आणि अगणनीय नामे :
(COUNTABLE AND UNCOUNTABLE NOUNS)
आधुनिक इंग्रजी ग्रामरमध्ये सामान्यपणे नामे दोन विभाग किंवा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.
१. गणनीय नामे (Countable Nouns)
२. अगणनीय नामे (Uncountable Nouns)
१. गणनीय नामे :
(Countable Nouns)
जी नामे मोजता येणे शक्य असते त्यांना गणनीय नामे असे म्हणतात.
गणनीय नामे मुळ स्वरुपातच अनेकवचनी असतात.
उदाहरणार्थ :
Names of people, Objects, Pen, Book, Horse, Elephant, Boy, Girl, Banana, Apple, children, dog.
२. अगणनीय नामे :
(Uncountable Nouns)
जी नामे मोजता येणे शक्य नसते किंवा त्यांना मोजण्यासाठी परिमाणाची साधनांचा आधार घ्यावा लागतो त्यांना अगणनीय नामे म्हणतात.
अगणनीय नामे मूलत: अनेकवजनी नसतात.
उदाहरणार्थ :
sugar, gold, oil, kerosene, sincerity, honesty, air, water.
अगणनीय नामापूर्वी गणनीय नामाचा वापर होतो तेव्हा a, an, the, a few, one, two, three, four, five इत्यादींचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
Countable Nouns :
A girl, A pen, A book, A few girls, A few books.
Many girls, Many Books, Some girls, Some books, A lot of books. etc.
Uncountable Nouns :
A little milk, A little sugar, Some Water, Much Salt, A lot of sugar. etc.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.