१४.उभयान्वयी अव्यये : (Conjunctions)
English Grammar in Marathi
१४.उभयान्वयी अव्यये :
(Conjunctions)
समान जातीचे दोन किंवा अधिक शब्द, दोन किंवा अधिक वाक्य किंवा पोटवाक्य एकत्र जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
दोन शब्द, दोन वाक्यांश अथवा दोन वाक्ये जोडावयाची असली की, उभन्वयी अव्ययाचा उपयोग करतात.
उदाहरणार्थ :
Rama amd Raghu came to school.
Shirish came late, so he was punished.
उभयान्वयी अव्ययाचे प्रकार (kinds of Conjunctions) :
उभवयान्वयी अव्यवाचे प्रमुख दोन प्रकार पडतात.
१.समान दर्जाची उभयान्वयी अव्यये Co-ordinating Conjunctions :
दोन स्वतंत्र विधाने जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाना समान दर्जाची उभयान्वयी अव्यये Co-ordinating conjunctions असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
The cows left the field and they moved to another place.
या वाक्यापैकी The cows left the field व they moved to another place ही स्वतंत्र वाक्ये होत.
२. गौन दर्जाची उभयान्वयी अव्यये Sub-ordinating Conjunctions :
दोन परस्परावलंबी विधाने ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यांना गौन दर्जाची उभयान्वयी अव्यये Sub-ordinating Conjunctions असे म्हणतात.
उदाहरणार्थ :
Ramesh was happy because he got the prize.
या वाक्यातील Ramesh was happy या वाक्याचा he got the prize या वाक्याशी संबंध आहे. ती दोन्ही वाक्ये एकमेकांवर अवलंबून आहेत.
समान दर्जाची उभयान्वयी अव्यये Co-ordinating conjucnctions चे चार प्रकार संभवतात.
१.बेरीज करणारी किंवा समुच्चयदर्शक उभयन्वयी अव्यये ( Cumulative or Copulative Conjunction) :
या प्रकारची उभयान्वयी अव्यये केवळ समान दर्जाचे घटक जोडण्याचे कार्य करतात.
उदाहरणार्थ :
Bapu is clever and sincere.
He took his bag and went to school.
२.फरक किंवा विरोध दाखविणारी उभयान्वयी अव्यये (Adversative Conjunction ) :
या प्रकारची उभयान्वयी अव्यये दोन विधानातील विरोध किंवा फरक स्पष्ट करुन त्यांना जोडण्याचे कार्य करतात.
उदाहरणार्थ :
Suhas is good but poor.
The Ganesh was rich and powerful, yet he was an unhappy man.
३.दोनपैकी एक मार्ग दर्शविणारी किंवा विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यये (Alternative Conjunctions) :
या प्रकारची उभयान्वयी अव्यये दोन पर्याय किंवा विकल्प असणाऱ्या घटकांना जोडण्याचे कार्य करतात.
उदाहरणार्थ :
She must weep or she will die.
I am not motivated by money, otherwise I would have quit.
४.निष्कर्ष काढणारी किंवा परिणामदर्शक उभयान्वयी अव्यये (Illative Conjunctions ) :
या प्रकारची उभयान्वयी अव्यये घटक किंवा विधाने यांचा अर्थ आणि वस्तुस्थिती यावरुन अनुमान किंवा परिणाम सांगतात.
उदाहरणार्थ :
Shyam was careless therefore he was punished.
He came to search for his brother.
समान दर्जाची उभयान्वयी अव्यये Co-ordinating Conjunctios या प्रकारातील काही उभयान्वयी अव्यये :
Also, as well as, and, both, yet, still, or, neithet-nor, else, nor, therefore, so, for.
-----------
गौन दर्जाची उभयान्वयी अव्यय Sub-ordinating conjunctions :
या प्रकारातील प्रमुख उभयान्वयी अव्यये.
where, while, how, though, unless, although, till until, even if, lest, than, after, because, as, since, if, than, when इत्यादी
मुख्य वाक्याशी दुय्यम किंवा गौन वाक्य जोडण्याचे कार्य ही उभयान्वये करतात. यावरुन त्यांचा संबंध पोटवाक्य किंवा उपवाक्या यांच्याशी येतो.
या उभयान्वयी अव्ययांचे दोन भाग करता येतील पहिल नामदर्शक पोटवाक्ये जोडणारे व दुसरा भाग क्रियाविशेषणबोधक पोटवाक्ये जोडणारे उभयान्यवयी अव्यय.
नामदर्शक पोटवाक्ये मुख्य वाक्याशी जोडणारे प्रमुख उभयान्वयी अव्यय आहे.
उदाहरणार्थ :
He thinks that he will succeed.
This is where he lives.
I can not tell why he is late.
I know what she is doing.
क्रियाविशेषणबोधक पोटवाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पुढील प्रमाणे :
१. कालदर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययाच्या साहाय्याने मुख्य वाक्याशी जोडलेल्या क्रियाविशेषणबोधक पोटवाक्यातील वेळ किंवा काल यांचा बोध होतो.
उदाहरणार्थ :
After, till, since, before, as soon as, until, when, while, as.
He came after I had finished the work.
As he paused, the voice rang out again.
We were playing while he was watching TeleVision.
२. अटदर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययांच्या साहाय्याने अटीचा उल्लेख होतो.
उदाहरणार्थ :
If, unless, if only, provided.
If He comes, I will play.
Unless my friend comes, I will not go.
३. हेतूदर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययाच्या साहाय्याने हेतु स्पष्ट होतो.
उदाहरणार्थ :
That, lest, so that, in order that.
He worked hard so that he might pass.
We eat that we may live.
We sow that we may reap.
Be careful lest you should fall.
४. कारणदर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययांच्या साहाय्याने कारण दर्शविले जाते.
उदाहरणार्थ :
Because, as, since.
The fats collect on the surface and form a layer, since they are lighter than milk.
Do not drink because this is an enchanted pool.
५.परिणामदर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययाच्या साहाय्याने परिणाम स्पष्ट होतो.
उदाहरणार्थ :
so .... that
It become so dark that I could not read easily.
६.विरोधदर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययाच्या साहाय्याने विरोध स्पष्ट होतो.
उदाहरणार्थ :
though, although.
Though she is poor, she is honest.
Although Shyam looked about him, he could see no one.
Even though a vegetable was produced, it had no commercial value.
७. रीत किंवा मर्यादादर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययाच्या साहाय्याने रीत किंव मर्यादा स्पष्ट होते.
उदाहरणार्थ :
As
Do as I tell you.
८. तुलनादर्शक :
या प्रकारच्या गौन उभयान्वयी अव्ययाच्या साहाय्याने तुलना स्पष्ट होते.
उदाहरणार्थ :
Than
Ramesh is clever than Suresh.
-------------
परस्परसंबंधदर्शक किंवा सहसंबंधात्मक उभयान्वयी अव्यये (Correlative Conjunctions) :
काही उभयान्वयी अव्यये एकमेकांच्या बरोबर जोडीनेच येतात, त्यांचा परस्परसंबंध असल्याने त्यांचा जोडीने वापर केला जातो. त्यापैकी बहुतेक उभयान्वयी अव्यय समानदर्जाची (Co-ordinating Conjunctions) आहेत. ही जोडीनेच वापरतात, त्यांच्या कोणत्याही शब्दाबद्दल दुसरा शब्द वापरता येत नाही.
उदाहरणार्थ :
Either .... or
Through ... yet
Neither ... nor
As... so
Both ... and
So... that
Such ... as
Not only ... but also
No sooner ... than
So .... as
Scarcely ... when
As ... as
No other ... than
Hardly .... when
Although .... yet
Whether ... or
He was so tired that he could not walk.
She is neither beautiful nor clever.
He is either lazy or foolish.
Both Shyam and Hari are present.
He lost not only his book but also his pen.
काही वेळेस Though / Altough .... yet मधील yet बहुतेक वेळा गाळतात.
तसेच Not only ... but also मधील also ही गाळतात.
------------
शब्दसमूह युक्त उभयान्वयी अव्यये (झहीरीश उेपक्र्षीपलींळेपी) :
या प्रकारच्या अव्ययांमध्ये शब्दसमूह सलग असतात आणि तसेच एकत्रित वापरतात.
उदाहरणार्थ :
as soon as, in order that, as well as, on condition that, as far as, even if, as if, as though, so that.
Shyam as well as Hari came late.
He behaves as if he is innocent.
Even if it rains, he will come.
As soon as the teacher entered the class, the boys stood up.
We started early so that we might not miss the bus.
काही शब्दांचा वापर शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय म्हणून दोन्ही प्रकारे केला जातो.
उदाहरणार्थ :
Before.
She stood before the mirror.(Preposition)
Look before you leap.(Conjunction).
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.