१२.काळ : (Tenses)
English Grammar in Marathi
१२.काळ :
(Tenses)
नामाची क्रिया सांगणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. व क्रिया केव्हा घडली याचा बोध क्रियापदावरुन होतो त्यालाच क्रियापदाचा काळ असे म्हणतात.
१.वर्तमानकाळ (Present Tense)
२.भूतकाळ (Past Tense)
३.भविष्यकाळ (Future Tense)
असे काळाचे प्रमुख तिन प्रकार आहेत.
त्यातही प्रत्येक प्रकाराचे साधा (Simple),अपूर्ण (Imperfect),पूर्ण (Perfect)व पूर्ण चालू (Perfect Continuous)असे उपप्रकार आहेत.
१.साधा वर्तमानकाळ (Simple present tense ) :
मी (I) या प्रथम पुरूषवाचक सर्वनामाच्या पुढे क्रियापदाचे मूळ रूप ठेवले की वर्तमानकाळी प्रथम पुरूषी एकवचनाचा अर्थ होतो.
जसे-मी बसतो - I sit.
इंग्रजीमध्ये लिंगाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही मराठीमध्ये मात्र ते बदलते. मी बसतो असे पुलिं्लगी रूप मराठीत होते. पण मी बसते असे स्त्रीलिंगी मराठीत होते. याउलट इंग्रजीत मी बसतो व मी बसते यासाठी I sit हेच रूप असते.
साधा वर्तमानकाळ तयार करताना प्रथम पुरूषी व द्वितीय पुरूषी एकवचनी व अनेकवचनी क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. तसेच तृतीय पुरूषी अनेकवचनी क्रियापदाचे रूपही बदलत नाही. पण वर्तमानकाळी तृतीय पुरूषी एकवचनी रूप होताना क्रियापदाला s किंवा es हा प्रत्यय लावतात.
उदा. तो बसतो - He sits.
क्रियापदाचे अंत्याक्षर s,sh, ch, z किंवा o असेल तर es प्रत्यय लागतो.
उदाहरणार्थ :
१.तो उत्तीर्ण होतो - He passes.
२.तो ढकलतो - He pushes.
३.ती पकडते - She catches
४.ती जाते - She goes.
क्रियापदाचे उपांत्याक्षर व्यंजन व अंत्याक्षर y असेल तर es हा प्रत्यय लागतो व तो लागताना y चा i होतो.
जसे - ती रडते She cries.
आता आपण To go या क्रियापदाची साध्या वर्तमानकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची साध्या वर्तमानकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष- First person | मी जातो I go | आम्ही जातो We go
----------
द्वितीय पुरूष - Second person| तू जातोस You go | तुम्ही जाता You go
----------
तृतीय पुरूष - Third person | तो जातो He goes | ते जातात They go
तृतीय पुरूष - Third person | ती जाते She goes | ते जातात They go
तृतीय पुरूष - Third person | ते जाते It goes | ते जातात They go
-----------
साधा वर्तमानकाळाचा उपयोग :
सत्य किंवा नेहमी घडणाऱ्या सर्वसामान्य घटना सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
One and one make two.
Man is mortal.
The sun rises in the east.
नित्यनियमाने केली जाणारी क्रिया दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. अशा वाक्यात always, never, usually, everyday, daily, generally असे क्रियादर्शक शब्द वापरतात.
उदाहरणार्थ :
Geeta usually comes late.
Two watches never agree.
He writes with his left hand.
भविष्यकाळात घडणारी परंतु पूर्वनियोजित घटना सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
We leave for Pune tomorrow morning.
The Chief Minister visits Pune next Monday.
गुंतागुंतीच्या वाक्यामध्ये किंवा गौण वाक्यातील जी वेळ भविष्यकाळातील परंतु केव्हा घडेल हे अनिश्चित असेल अशा वेळा दाखविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
We will play when th rain stops.
Polish my shoes till they shine.
When milk is heated, some of th water in the milk evaporates.
अट दाखाविणाऱ्या पोटवाक्यात या काळाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
If she comes, I will not play.
If I go to school, I shall become wise.
प्रत्यक्ष समोर घडत असलेली घटना पाहून here and there ची रचना करताना या काळाचा उपयोग होतो. अशी वाक्य उद््गारवाचक असतात.
उदाहरणार्थ :
Here she comes !
There he goes !
Here comes the bus !
------------------
२. साधा भूतकाळ (Simple past tense ) :
या काळात क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असा बोध होतो. काही वेळा क्रियापदाचे भूतकाळी रूप तयार करताना त्यास ed हा प्रत्यय लागतो. जसे मी थांबलो I stopped.
पण सामान्यत: क्रियापदाचे भूतकाळी रूप वेगळेच होते. जसे मी गेलो I went. येथे से या क्रियापदाच्या रूपाचे भूतकाळी go असे रूप होते. ही रूपे तिन्ही पुरूषांत तसेच एकवचन व अनेकवचन यात समान असतात.
आता आपण To go से या क्रियापदाची साध्या भूतकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची साध्या भूतकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I went | We went
----------
द्वितीय पुरूष - Second person | You went | You went
----------
तृतीय पुरूष - Third person | He went | They went
तृतीय पुरूष - Third person | She went | They went
तृतीय पुरूष - Third person | It went | They went
-----------
साधा भूतकाळाचा उपयोग :
भूतकाळात घडलेल्या घटना सांगण्याकरिता या काळाचा उपयोग होतो. सामान्यत: या वाक्यात खालील प्रकरची भूतकालदर्शक क्रियाशेविशेषणे वापरतात.
yesterday, last year, day before yesterday, one day, ago, last week, once, long ago.
उदाहरणार्थ :
Long ago, in England, there lived a great Princess.
The tortoise met rabbit one day.
The accident took place yesterday.
अर्थ किंवा संदर्भ यावरुन अप्रत्यक्षपणे भूतकाळ सूचित करुन प्रश्नातसुद्धा साधा भूतकाळच वापरतात.
उदाहरणार्थ :
She lost her mother when she was very young.
Her example inspired her workers.
The doctor heard it and rushed out of her consultation room.
नित्यनियमाने केलेली भूतकालीन क्रिया व्यक्त करण्याकरिता या काळाचा वापर करतात. कालदर्शक शब्द असो किंवा नसो, या प्रकारच्या क्रियेचा कालखंड अनिश्चित असल्यार्स used to चा वापर करतात.
उदाहरणार्थ :
Years ago, my father drove a bicycle, but now he has a car.
He never neglected the poor.
Rohan studied many hours every day.
The teacher always carried an umbrella.
------------
३.साधा भविष्यकाळ (Simple future tense ) :
जी क्रिया भविष्यात घडावयाची आहे अशा क्रियेसाठी या काळाचा वापर होतो.
क्रियापदाच्या पूर्वी प्रथमपुरुषी shall व द्वितीय व तृतीयपुरषी will ही सहाय्यकारी क्रियापदे असली म्हणजे साधी भविष्यकाळी रूपे होतात.
आता आपण To go या क्रियापदाची साधा भविष्यकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची साधा भविष्यकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I shall go | We shall go
----------
द्वितीय पुरूष - Second person | You will go | You will g
----------
तृतीय पुरूष - Third person | He will go | They will go
तृतीय पुरूष - Third person | She will go | They will go
तृतीय पुरूष - Third person | It will go | They will go
-----------
साधा भविष्यकाळाचा उपयोग :
जी क्रिया भविष्यकाळात घडावयाची आहे अशा क्रियेसाठी वाक्यात या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
I shall visit the school tomorrow.
You will find that out later on.
अटीदर्शक वाक्यात या काळाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
He will agre if you ask him nicely.
If you run, you will catch the train.
------------
१.अपूर्ण वर्तमानकाळ ( Imperfect present tense ) :
क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक धातूसाधितांपूर्वी हया क्रियापदाचे योग्य रूप ठेविले व क्रियापदास प्रत्यय लावला की अपूर्ण वर्तमानकाळ सिध्द होतो. या काळात क्रियापदाला ing प्रत्यय जोडून त्यापूर्वी to be चे साध्या वर्तमानकाळाचील रुप वापरतात. या काळात ing युक्त रुप क्रियापद म्हणून वापरताना to be या साहाय्यकारी क्रियापदाची मदत घ्यावी लागते.
उदाहरणार्थ :
मी जात आहे - I am going.
क्रियापदाच्या मूळ रूपाला ing हा प्रत्यय लावला की, त्या क्रियापदाचे वर्तमान कालवाचक धातूसाधित सिध्द होते. जसे- जाणे - go, जात - going, करणे - to do, करीत - doing.
क्रियापदाच्या उपांत्य वर्ण व्यंजन व अंत्य वर्ण e हा असला तर ing प्रत्यय लावताना e चा लोप होतो.
जसे- लिहिणे- write, लिहीत - writing.
क्रियापदाच्या शेवटी ie हे वर्ण असले तर त्यांच्या जागी y हा वर्ण घालावा.
जसे मरणे - to die, मरत - dying
क्रियापदाच्या शेवटी व्यंजन व त्याअगोदर स्वर असेल तर अंत्य व्यंजनाचे द्वित्व होते.
उदा.धावणे - to run, धावत - running
आता आपण To go या क्रियापदाची अपूर्ण वर्तमानकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची अपूर्ण वर्तमानकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I am going | We are going
----------
द्वितीय पुरूष - Second person | You are going | You are going
----------
तृतीय पुरूष - Third person | He is going | They are going
तृतीय पुरूष - Third person | She is going | They are going
तृतीय पुरूष - Third person | It is going | They are going
-----------
अपुर्ण वर्तमानकाळाचा उपयोग :
प्रत्यक्ष समोर क्रिया चालू असताना या काळाचा उपयोग होतो, सामान्यत: या प्रकारच्या वाक्यात now, at present, at this moment अशा शब्दांचा वापर करतात. परंतु हे शब्द असलेच पाहिजेत असे नाही.
उदाहरणार्थ :
I am writing a letter.
Ganesh is reading a book now.
They are playing cricket at present.
नजीकच्या भविष्यकाळातील नियाजित किंवा निश्चित क्रिया दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
You have to stop because otherwise I am jumping out.
He is leaving for Delhi tomorrow.
क्रिया चालू असण्याचे सूचित करण्याकरिता या काळाचा उपयोग होतो. परंतु कदाचित प्रत्यक्ष बोलण्याच्या वेळेला ती क्रिया चालू नसेलही.
उदाहरणार्थ :
Seeta is helping her mother in cooking.
I hear that our cricket team is doing really well.
The students are assisting their elders in research.
काही क्रियापदे सामान्यत: अपूर्ण काळात वापरत नाहीत :
Non - conclusive (निश्चायक) Verb :
उदाहरणार्थ :
मानसिक स्थिती आणि प्रक्रियेसाठी (for mental state and process) :
agree, disagree, believe, disbelive, remember, forget, hope, find, doubt, imagine, know, trust, understand, suppose, mean, foresee, think, recognise, recollect, recall, admire.
इच्छा आणि भावना, आवड आणि नावड याकरिता (for desire and feeling, likes and dislikes) :
want, desire, wish, need, like, dislike, love, hate, please, feel, forgive, mind, prefer.
उदाहरणार्थ :
appear, resemble, measure, seem, possess, deserve, suffice, contain.
धारणा आणि संवेदनासाठी (for perception and sensation) :
smell, taste, notice, hear, feel (touch) see, observe.
----------
२. अपूर्ण भूतकाळ (Imperfect past tense ) :
क्रिया भूतकाळात चालू होती हे दर्शविण्यासाठी या काळाचा वापर होतो. क्रियापदाच्या धातुसाधिताच्या पूर्वी to be हया क्रियापदाचे भूतकाळी योग्य रूप ठेविले की अपूर्ण भूतकाळ (Imperfect past tense) सिध्द होतो.
उदाहरणार्थ :
मी जात होतो.- I was going
आता आपण To go या क्रियापदाची अपूर्ण भूतकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची अपूर्ण वर्तमानकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I was going | We were going
----------
द्वितीय पुरूष - Second person | You were going | You were going
----------
तृतीय पुरूष - Third person | He was going | They were going
तृतीय पुरूष - Third person | She was going | They were going
तृतीय पुरूष - Third person | It was going | They were going
-----------
अपूर्ण भूतकाळाचा उपयोग :
क्रिया भूतकाळात चालू होती हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो सामान्यत: कालदर्शक शब्द वाक्यात असतो पण तो असलाच पाहिजे असे नाही.
उदाहरणार्थ :
We were crying and shivering with fright.
One summer evening I wat sitting by th open window.
The little boy was singing as she worked in her small garden.
नित्यनियमाने केलेल्या क्रिया किंवा सवयीदेखील कधी कधी या काळात व्यक्त करतात.
उदाहरणार्थ :
Geeta was always grumbling.
The patient was talking excitedly.
----------
३. अपूर्ण भविष्यकाळ (Imperfect future tense ) :
क्रियापदाच्या धातुसाधितांपूर्वी shall व will या सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप व त्यानंतर to be चे योग्य रूप असले की अपूर्ण भविष्यकाळी रूपे तयार होतात.
जसे - मी जात असेन - I shall be going.
आता आपण To go या क्रियापदाची अपूर्ण भूतकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची अपूर्ण वर्तमानकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I shall be going | We shall be going
----------
द्वितीय पुरूष - Second person | You will be going | You will be going
----------
तृतीय पुरूष - Third person | He will be going | They will be going
तृतीय पुरूष - Third person | She will be going | They will be going
तृतीय पुरूष - Third person | It will be going | They will be going
-----------
अपूर्ण भविष्यकाळाचा उपयोग :
भविष्यकाळात चालू असणाऱ्या क्रियेसाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
We shall be visiting this school after the vacation.
They will be playing cricket then.
नियोजित भविष्यकालीन क्रिया सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
We will be meeting them next week.
She will be staying here till Monday.
* हा काळ फारसा वापरात नाही.
----------
१. पूर्ण वर्तमानकाळ ( Perfect present tense ) :
भूतकाळी जर आपण एखादी क्रिया सुरू केलेली असेल, आणि ती वर्तमानकाळी संपत असेल अथवा भूतकाळी केलेल्या क्रियेचे फळ वर्तमानकाळी सिध्द होत असेल, असा अर्थ असता पूर्ण वर्तमानकाळ ( Perfect present tense) वापरावा. क्रियापदाच्या भूतकालवाचक धातुसाधिताच्या पूर्वी to have या सहाय्यकारी क्रियापदाचे योग्य रूप वापरले म्हणजे पूर्ण वर्तमानकाळ सिध्द होतो.
जसे - मी गेलो आहे - I have gone.
आता आपण To go या क्रियापदाची पूर्ण वर्तमानकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची पूर्ण वर्तमानकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I have gone | We have gone
----------
द्वितीय पुरूष - Second person | You have gone | You have gone
----------
तृतीय पुरूष - Third person | He has gone | They have gone
तृतीय पुरूष - Third person | She has gone | They have gone
तृतीय पुरूष - Third person | It has gone | They have gone
-----------
पुर्ण वर्तमानकाळाचा उपयोग :
अगदी जवळच्या काळात पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
It has just started raining.
She has just gone home.
भूतकाळात सुरु झालेली आणि या क्षणापर्यंत चालू असलेली क्रिया सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. अशा प्रकारच्या वाक्यात सामान्यत: since किंवा for चा उपयोग आढळतो.
उदाहरणार्थ :
I have provided man with food to eat.
He has taught us for the last six months.
भूतकाळात घडलेल्या घटनेची निश्चित वेळ सांगता न येणाऱ्या क्रियेबद्दल किंवा परिणाम अजूनही आहे हे दर्शविण्यासाठी या काळाचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
He has applied for the post.
Tell our neighbours we have caught the thieves.
कधी-कधी पूर्ण भविष्यकाळासाठी after, before, as soon as, when अशा शब्दांचा वापर करतात.
उदाहरणार्थ :
You can kill him only after you have killed me.
I will come only after I have finished this exercise.
---------
२.पूर्ण भूतकाळ - ( Prefect past tense )
क्रियापदाच्या भूतकालवाचक धातूसाधिताच्या पूर्वी to have या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी योग्य रूप ठेविले की, पूर्ण भूतकाळ सिध्द होतो.
जसे - मी गेलो होतो. I had gone.
आता आपण To go या क्रियापदाची पूर्ण भूतकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची पूर्ण भूतकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I had gone | We had gone
----------
द्वितीय पुरूष - Second person | You had gone | You had gone
----------
तृतीय पुरूष - Third person | He had gone | They had gone
तृतीय पुरूष - Third person | She had gone | They had gone
तृतीय पुरूष - Third person | It had gone | They had gone
-----------
पूर्ण भूतकाळाचा उपयोग :
दोन भूतकाळी क्रिया एका वाक्यातून सांगताना आधी घडलेल्या क्रियेसाठी पूर्ण भूतकाळ वापरतात.
उदाहरणार्थ :
The bus had already left when we reached the station.
It started raining after we had reached home.
I had completed my work before the bell ring.
विशिष्ट क्षण किंवा कालखंड यापूर्वीच पूर्ण झालेल्या क्रियेसाठीसुद्धा या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
Grandpa had not followed their advice.
I had met her in Mumbai in 1991.
अप्रत्यक्ष कथन (Indirect speech) करताना मूळच्या वाक्यात साधा भूतकाळ असेल तर त्याचा पूर्ण भूतकाळ होतो तसेच पूर्ण वर्तमानकाळ असेत तर त्याचाही पूर्ण भूतकाळ होतो.
उदाहरणार्थ :
She sharply reminded Gautami that she had told her many times.
Ali said that someone had taught him to say that.
-----------
३.पूर्ण भविष्यकाळ ( Perfect future tense ) :
भविष्यकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा वापर करतात.
कर्तापुढे Shall have (प्रथम पुरूषी एकवचनी अथवा अनेकवचनी कर्ता असतो ) व will have (द्वितीय व तृतीय पुरूषी उभयवचनी कर्ता असतो ) यापैकी योग्य ते रूप यातून त्याच्या पुढे भूतकाळवाचक धातूसाधित योजावे म्हणजे पूर्ण भविष्यकाळी रूप सिध्द होते.
उदा.- मी गेलेलो असेन - I shall have gone.
आता आपण To go या क्रियापदाची पूर्ण भविष्यकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची पूर्ण भविष्यकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I shall have gone | We shall have gone
----------
द्वितीय पुरूष - Second person | You will have gone | You will have gone
----------
तृतीय पुरूष - Third person | He will have gone | They will have gone
तृतीय पुरूष - Third person | She will have gone | They will have gone
तृतीय पुरूष - Third person | It will have gone | They will have gone
-----------
पुर्ण भविष्यकाळाचा उपयोग :
एखादी क्रिया भविष्यकाळात विशिष्ट वेळेला झालेली असेल असे दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
I shall have completed my work by that time.
Before the policemen go there, the robbers will have left the place.
----------
१.चालू पूर्ण वर्तमानकाळ (Present perfect continuous tense ) :
भूतकाळात सुरु झालेली क्रिया अद्यापही चालू आहे असे दर्शविण्यासाठी चालू पूर्ण वर्तमानकाळ वापरतात.
कर्तापुढे have been व त्याच्यापूढे वर्तमानकालवाचक धातुसाधिताचे रूप घातले म्हणजे चालू पूर्ण वर्तमानकाळ सिध्द होतो.
जसे - मी गेलेलो आहे. - I have been going.
आता आपण To go या क्रियापदाची चालू पूर्ण वर्तमानकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची चालू पूर्ण वर्तमानकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I have been going | We have been going
----------
द्वितीय पुरूष - Second person | You have been going | You have been going
----------
तृतीय पुरूष - Third person | He has been going | They have been going
तृतीय पुरूष - Third person | She has been going | They have been going
तृतीय पुरूष - Third person | It has been going | They have been going
-----------
चालू पूर्ण वर्तमानकाळाचा उपयोग :
एखादी क्रिया भूतकाळात सुरु झालेली असेल व अद्यापही चालू आहे असे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ :
I have been teaching in this school for the last tem years.
They have been playing since 8 a.m.
प्रदिर्घ काळ चालू असलेल्या क्रिया व्यक्त करण्यासाठी या काळाचा उपयोग होताना. सामान्यत: पुढील क्रियापदांचा या क्रियेसाठी वापर करतात. (wait, sit, live, stay, sleep, study)
उदाहरणार्थ :
How long have you been waiting for the bus?
He has been living in this house since 1990.
----------
२.चालू पूर्ण भूतकाळ ( Past perfect continuous tense ) :
एखादी क्रिया विशिष्ट वेळेपूर्वी सुरु झालेली होती आणि त्या भूतकालीन वेळेपर्यंत चालू होती हे चालू पूर्ण भूतकाळाने दर्शवितात.
कर्तापुढे had been व त्याच्यापूढे वर्तमानवाचक धातुसाधिताचे रूप घातले म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ सिध्द होतो.
जसे- मी गेलेला होतो - I had been going.
आता आपण To go या क्रियापदाची चालू पूर्ण भूतकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची चालू पूर्ण भूतकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I had been going | We had been going
----------
द्वितीय पुरूष - Second person | You had been going | You had been going
----------
तृतीय पुरूष - Third person | He had been going | They had been going
तृतीय पुरूष - Third person | She had been going | They had been going
तृतीय पुरूष - Third person | It had been going | They had been going
-----------
चालू पूर्ण भूतकाळाचा उपयोग :
उदाहरणार्थ :
I had been teaching in this school for twenty years and then I left the school.
At that time he had been writing a book for three months.
----------
३. चालू पूर्ण भविष्यकाळ (Future prefect continuous tense ) :
एखादी क्रिया भविष्यकाळात विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळाचा वापर करतात.
कर्तापुढे shall have been किंवा will have been असे शब्द घालून त्याच्या पुढे वर्तमानकाळवाचक धातुसाधिताचे रूप घातले म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ सिध्द होतो.
जसे- मी गेलेलो असेन - I shall have been going.
आता आपण To go या क्रियापदाची चालू पूर्ण भविष्यकाळाची रूपे पाहू.
जाणे - To go या क्रियापदाची चालू पूर्ण भविष्यकाळाची रूपे खालील प्रमाणे :
पुरूष - Person एकवचन - Singular अनेकवचन - Plural
----------
प्रथम पुरूष - First person | I shall have been going | We shall have been going
----------
द्वितीय पुरूष - Second person | You will have been going | You will have been going
----------
तृतीय पुरूष - Third person | He will have been going | They will have been going
तृतीय पुरूष - Third person | She will have been going | They will have been going
तृतीय पुरूष - Third person | It will have been going | They will have been going
-----------
चालू पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग :
हा काळ क्वचितच वापरतात.
उदाहरणार्थ :
By next June, I shall have been teaching in this school for twenty years.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.