१०. साहाय्यकारी क्रियापदे : (AUXILIARIES/HELPING VERBS)
English Grammar in Marathi
१०. साहाय्यकारी क्रियापदे :
(AUXILIARIES/HELPING VERBS)
वाक्यातील मुख्य क्रियापदाला मदत करण्याचे कार्य इतर काही क्रियापदे करतात. त्यांनाच साहाय्यकारी क्रियापदे (Auxiliaries / Helping Verbs) असे म्हणतात. त्यांचा उपयोग वाक्ंयाचे / क्रियापदाचे काळ तयार करण्यासाठी (साधा वर्तमानकाळ व साधा भूतकाळ सोडून इतर काळ), प्रयोग बदलण्यासाठी, प्रश्नार्थक किंवा नकारात्मक वाक्य बनविण्यासाठी होतो.
अशी साहाय्यकारी क्रियापदे खालीलप्रमाणे :
1.be ची रुपे - am, are, is, was, were
2.have ची रुपे - have, has, had
3.do ची रुपे - do, does, did
4.can
5.could
6.shall
7.should
8.will
9.would
10.may
11.might
12.must
13.ought (to )
14.need
15.dare
16.used to
ही साहाय्यकारी क्रियापदे -
१.काळ बनविण्यासाठी उपयोगी पडतात.
२.प्रयोग बदलताना मदत करतात.
३.प्रश्नार्थक वाक्य तयार करताना उपयोगी पडतात.
४.नकारार्थी वाक्य तयार करताना मदत करतात.
५. तसेच काही विशिष्ट रचनेतही वापरतात.
प्राथमिक साहाय्यकारी क्रियापदे (Primary Auxiliaries) :
साहाय्यकारी क्रियापदांपैकी be, have आणि do ची रुपे यांना प्राथमिक साहाय्यकारी क्रियापदे Primary Auxiliaries म्हणतात.
यांचा -
१.मुख्य क्रियापद व साहाय्यकारी क्रियापद म्हणून उपयोग होतो.
२.आज्ञार्थी, प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य बनविताना वापरतात.
३.तसेच मुख्य क्रियापदाचे काळ बनविताना उपयोग होतो.
शैलि-विषयक साहाय्यकारी क्रियापदे Modals किंवा Modal Auxiliaries :
be, have आणि do ही Primary Auxiliaries सोडून इतर साहाय्यकारी क्रियापदांना (Modals / Modal Auxiliaries ) असे म्हणतात. त्यांच्या साहाय्याने मन:स्थिती, परवानगी, शक्यता, बंधन, अपेक्षा, आशा इत्यादी मानसिक कल्पना / विचार प्रकट करणे सोपे जाते.
Modals Auxiliaries पैकी - can, could, shall, should, will, would, may, might, must, आणि ought (to) यांना Defective Verbs (अपूर्ण क्रियापदे) असे म्हणतात.
त्यांना तृतीय पुरूषी एकवचनी रूपात S प्रत्यय लागत नाही.
त्यांचे infinitive (अनियमित मूळ रुप) रूप तयार होत नाही आणि त्यांचे युक्त रूपही तयार होत नाही.
कर्ता कोणत्याही पुरूष / वचन यामध्ये असला तरी त्यांचे रूप एकच असते.
स्वत:चा अर्थ नाही म्हणून स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही. त्यांच्याबरोबर मुख्य क्रियापद वापरतात.
will, need, dare (to) ही मुख्य क्रियापदे म्हणूनही वापरतात. त्या वेळी त्यांचा अर्थ वेगळा असतो. त्या वेळी ते साहाय्यकारी क्रियापदाची भूमिका करीत नाहीत.
उदाहरणार्थ :
1. He wills to donate the amount to the institution.
तो संस्थेला देणगी देण्याची इच्छा करतो.
2.I need your help.
मला तुझ्या मदतीची गरज आहे
3.I dare you to do this.
मी तुला हे करण्याची हिम्मत दिली.
4.She dares to play inspite of her illness.
आजारी असूणही ती खेळण्याची हिम्मत करते.
----------
साहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग :
१. be ची रूपे ( am, is, are, was, were):
अस्तित्वदर्शक मुख्य क्रियापद व मुख्य क्रियापद म्हणून उपयोग :
उदाहरणार्थ :
Shankar is a farmer.
There are books in the cupboard.
Linking Verb तशील (जोडणारे क्रियापद ) म्हणून उपयोग :
उदाहरणार्थ :
Ram is very clever.
My pen is in the bag.
अपूर्ण काळ बनविताना उपयोग :
I am writing.
She was playing yesterday.
कर्मणी प्रयोग Passive voice रचना करताना उपयोग :
The thief was taken to the police station.
इतर काही विशिष्ट प्रसंगी म्हणून उपयोग :
उदाहरणार्थ :
He is happy.
He is ten (ten years old).
It is very cold today.
It is seven p.m.
---------
२. Have ची रूपे (have, has, had ) :
मुख्य क्रियापद म्हणून जवळ असणे/ बाळगणे अशा अर्थी उपयोग :
I have a pen.
पूर्ण काळ करताना उपयोग :
I have written a letter.
प्रश्नार्थक वाक्य तयार करताना उपयोग :
Have they written the exercise ?
आज्ञा दर्शविण्याकरिता Infinitive सोबत उपयोग :
He has to move the furniture himself.
I have to start writing immediately.
She had to go to Delhi for the interview.
---------
३. Do ची रूपे (( do, does, did):
मुख्य क्रियापद म्हणून उपयोग :
Do your homework.
नकारार्थी वाक्य बनविताना उपयोग :
He didn't return the book.
प्रश्नार्थक वाक्य बनविताना उपयोग :
Do you go to school regularly ?
क्रियापदाच्या अर्थावर जोर देण्यासाठी किंवा ठामपणा दाखविण्यासाठी उपयोग :
Come च्या ऐवजी Do come.
Do learn by heart.
पूर्वीच्या वाक्यातील क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपयोग :
Do you know the reason ? Yes, I do.
Lata sings well. Doesn't she ?
Lata sings as her sister does.
--------
४. Can या साहाय्यकारी क्रियापदाचा वापर योग्यता आणि क्षमता ability and capacity व्यक्त करण्यासाठी केला जातो.
सामथ्र्य म्हणून उपयोग :
I can read this lesson.
She is so weak that she cannot walk.
शक्यता म्हणून उपयोग :
He can be troublesome.
You can't send the letter.
परवानगी म्हणून उपयोग :
You can go to a cinema now.
Can I take your book ?
विनंती म्हणून उपयोग :
Can you give me your book ?
भावना (अस्वस्थता) व्यक्त करणे म्हणून उपयोग :
Where can be my pen?
Where can I sit ?
सूचना म्हणून उपयोग :
Can we go to a cinema ?
एखादी गोष्ट देऊ करणे म्हणून उपयोग :
Can I help you ?
Can I give you my pen ?
मनाई म्हणून उपयोग :
You can't leave this place.
----------
५. Could हे can या साहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी रूप :
भूतकाळातील शक्यता दाखविण्यासाठी याचा उपयोग होतो.
१.भूतकाळी साहाय्यकारी क्रियापद म्हणून उपयोग :
She could not find the book.
He could walk after three days.
२.विनंती किंवा नम्रता म्हणून उपयोग :
Could you read for me ?
Could I see it ?
Could you tell me the address ?
३.गूढता किंवा अधिरता म्हणून उपयोग :
What could it be ?
४. अप्रत्यक्ष कथन करताना उपयोग :
He said that he could read the lesson.
५. शक्यता असूनही न केलेली गोष्ट म्हणून उपयोग :
I could have given you the book, why didn't you ask for it ?
If he could have asked for the book, he could get it.
६.अनुमान किंवा शक्यता म्हणून उपयोग :
Someone could have taken my pen.
She could not have taken the pen.
Could they be waiting for us?
---------
६. Shall हे साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी वापर करतात :
प्रथम पुरूषबरोबर (I, we ) वापरल्यास क्रियापदाचे भविष्यकाळी रूप तयार होते. द्वितीय आणि तृतीय पुरूषाबरोबर वापरल्यास भविष्यकाळ होत असला तरी क्रियापदाचा अर्थ भाग पडणे किंवा करावे लागणे (धमकी, हुकुमत किंवा वचक) असा होतो. सध्या किंवा अलीकडे हा फरक लक्षात न घेता सरसकट will वापरण्याकडे प्रवृत्ती वाढते आहे.
उदाहरणार्थ :
१. भविष्यकाळासाठी उपयोग :
I shall give you the book in the evening.
We shall play cricket tomorrow.
He will come in time.
परंतु निर्धार किंवा निश्चित इच्छा व्यक्त करण्यासाठी shall च्या ऐवजी वापरतात.
I will pass the examination.
२. परवानगी किंवा सूचित आमंत्रण म्हणून उपयोग :
Shall we play ?
३.आश्वासन किंवा वचन म्हणून उपयोग :
You shall have a holiday tomorrow.
४. द्वितीय व तृतीय पुरूषाबरोबर वापरून धमकी किंवा आज्ञा किंवा निर्धार म्हणून उपयोग :
You shall do as I tell.
You shall not go.
You shall obey my orders.
----------
७. Should हे shall या साहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे.
याच्या वापराने क्रिया घडण्याची अपेक्षा असते, क्रिया करणे भाग आहे अशा अर्थाने वापरतात.
उदाहरणार्थ :
१.कर्तव्य किंवा नैतिक बंधन म्हणून उपयोग :
We should always tell the truth.
The rich should help the poor.
Children should obey their parents and teachers.
२.परवानगी म्हणून उपयोग :
Should we take the luggage with us ?
३.नम्रतापूर्वक औपचारिक विनंती म्हणून उपयोग :
I should be glad if you could help me.
४.माहिती किंवा मत किंवा सूचना म्हणून उपयोग :
I should be glad to know the amount of pending bills.
५.इतर काही उपयोग :
He should have been more careful.
I should be glad to meet your teacher.
Should it rain today, they will not come.
It is important that you should pass the entrance examination.
Which one should I take ?
------------
८. Will हे साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहाय्यकारी क्रियापद. तसेच त्याचे इतरही उपयोग आहेत.
उदाहरणार्थ :
१.साधा भविष्यकाळ म्हणून उपयोग :
Tomorrow will be Sunday.
२.इच्छा किंवा संकल्प किंवा वचन व्यक्त करताना उपयोग :
We will go for the picnic.
I will try my best to help you.
३.धमकी देताना उपयोग :
Will you keep quiet ?
४.निश्चय करताना उपयोग :
I will work hard to get more marks.
५.विशिष्ट सवयीचे वर्णन करताना उपयोग :
She will talk about nothing but film-songs.
६. अनुमान किंवा गृहीत किंवा शक्यता व्यक्त करताना उपयोग :
That will be the postman.
I think, I suppose , I bet यांचा ही वापर वरील वाक्यात करता येतो.
७. अप्रत्यक्ष आज्ञा किंवा हुकुम देताना उपयोग :
You will assemble on the ground for parade.
You will finish the exercise before going home.
८.विनंतीसाठी उपयोग (will you ) :
Will you give me your book?
Will you close the window, please ?
९.अटदर्शक वाक्यात उपयोग :
If she comes, I will not play.
----------
९. Would हे will चे भुतकाळी रूप आहे. याचे साहाय्यकारी क्रियापद म्हणून व इतरही उपयोग आहेत.
१.नम्र विनंती (अधिक परिणामकारक) म्हणून उपयोग :
Would you give me your notes ?
Would you close the door, please ?
Would you take something ?
२.इच्छा किंवा मत व्यक्त करताना उपयोग :
Would you like to give an order, Sir ?
I wish you would not talk loudly.
३.निश्चय किंवा संभव व्यक्त करताना उपयोग :
She would not play today.
He would go whether you like it or not.
She would have her own way.
४.अप्रत्यक्ष कथन करताना उपयोग :
He told that he would not sing.
५.सवय म्हणून उपयोग :
She would sit for hours watching TV.
६. अटदर्शक वाक्यात उपयोग :
Had he played we would have won the match.
If he had studied hard, he would have passed.
---------
१०. May या साहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग परवानगी, शक्यता वर्तविणे, हेतुदर्शक इत्यादी कार्यांसाठी केला जातो.
उदाहरणार्थ :
१.परवानगी किंवा औपचारिक परवानगी घेताना उपयोग :
May I come in, Sir ?
May I borrow your book?
You may go.
२.शक्यता किंवा संभव व्यक्त करताना उपयोग :
She may be in the library.
It may rain today.
३.सदिच्छा व्यक्त करताना उपयोग :
May god bless you !
May god help you !
४.हेतू व्यक्त करताना उपयोग :
We eat so we may live.
Perhaps they may be guided by the sun.
५. May च्या साहाय्याने औपचारिक परवानगी किंवा शक्यता दर्शविली जाते तर can चा वापर क्षमता किंवा सामथ्र्य व्यक्त करतो.
७.साधारणत: नकारार्थी वाक्यात can वापरतात.
It cannot be true.
-----------
११. Might हे may चे भुतकाळी रूप आहे. तरीदेखील might चे आणखीही उपयोग आहेत.
उदाहरणार्थ :
१.क्षीण शक्यता व्यक्त करताना उपयोग :
It might rain today.
He might open an account.
She might buy a new car.
She might come today.
२.असमाधान किंवा नापसंती व्यक्त करताना उपयोग :
You might pay more attention to your studies.
You might be a little more careful while driving.
३.अप्रत्यक्ष कथन करताना उपयोग :
The boy said that he might have taken the book home.
४.अटदर्शक वाक्यात उपयोग :
If you called him, he might come.
----------
१२. Must या साहाय्यकारी क्रियापदाच्या मदतीने आवश्यकता, निश्चितता, खात्री, संभव किंवा अनुमान इत्यादी अर्थ व्यक्त करता येतात.
उदाहरणार्थ :
१.आवश्यकता किंवा नैतिक बंधन व्यक्त करताना उपयोग :
We must obey the rules.
We must pay the tax.
You must not copy in the examination hall.
२.नकार किंवा काही करू नये किंवा मनाई किंवा प्रतिबंध अशा अर्थी उपयोग :
You must not play on the road.
३.आज्ञा व्यक्त करताना उपयोग :
You must read and write at home.
४.संभव किंवा शक्यता किवा दाट शक्यता गृहीत धरून वाक्यात उपयोग :
Somebody must have informed him.
He must be made to behave like this.
You must have met Birbal.
५.कर्तव्य म्हणून वाक्यात उपयोग :
A judge must be impartial.
Soldiers must obey orders without questions.
६.अप्रत्यक्ष कथन म्हणून उपयोग :
He said that he must have played for the team.
७.निश्चितता किंवा अनुमान म्हणून उपयोग :
If they have not taken their food, they must be feeling hungry.
The bus must have gone.
८. Must चा नामासारखाही उपयोग केला जातो.
This book is must for you.
------------
१३. Ought to या साहाय्यकारी क्रियापदाचा अर्थ नैतिक बंधन, कर्तव्य, आवश्यकता असा आहे. याचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत.
उदाहरणार्थ :
We ought to love our neighbours.
The rich ought to help the poor.
Children ought to respect their parents.
You ought to speak the truth.
He ought to respect your elders.
----------
१४. Need या क्रियापदाचा उपयोग मुख्य क्रियापद व साहाय्यकारी क्रियापद अशा दोन्ही प्रकारे केला जातो. सामान्यत: नकारार्थी वाक्यात जास्त वापर होतो :
उदाहरणार्थ :
He needs your help.
I need the money to pay the fees.
She needn't have bought that car.
---------
१५. Dare या क्रियापदाचा उपयोग दोन अर्थाने केला जातो. मुख्य क्रियापद म्हणून याचा अर्थ आव्हान देणे किंवा प्रतिकार करणे असा आहे. या वेळी या क्रियापदाची रूपे dare, dares, dared अशी सर्व प्रकारची होतात. मात्र धाडस करणे किंवा धैर्य असणे अशा अर्थाने वापरताना बहुधा नकारार्थी किंवा प्रश्नार्थक रचना वापरतात. या अर्थाने वापरताना हे साहाय्यकारी क्रियापदाचे काम करते व म्हणून वरीलप्रमाणे रूपे होत नाहीत.
उदाहरणार्थ :
He dares me to fight.
She dared him to answer the question.
The child doesn't dare to go alone.
How dare you oppose me ?
----------
१६. Used to या साहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग भूतकाळातील सवय दर्शविण्यासाठी जातो.
उदाहरणार्थ :
When I was studying in college I used to smoke cigarette.
I used to live there when I was small.
I am used to the habit.
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.