३.शब्दांच्या जाती : (PARTS OF SPEECH)
English Grammar in Marathi
३.शब्दांच्या जाती :
(PARTS OF SPEECH)
वाक्यात येणाऱ्या शब्दांची वेगवेगळी कार्य असतात त्या कार्यावरुन त्यांना नावे देण्यात आली आहेत त्या नावांनाच शब्दांच्या जाती (PARTS OF SPEECH) असे म्हणतात.
मराठी भाषेप्रमाणेच इंग्रजी भाषेतही शब्दांच्या आठ जाती आहेत. त्यांना दोन गटात विभागण्यात आले आहे. विकारी व अविकारी, विकार म्हणजे बदल होय.
प्रत्येक शब्द त्यापैकी कोणत्या तरी जातीचा असतो.
शब्दांच्या आठ जाती पुढील प्रमाणे :
विकारी :
१. नाम - Noun (नाऊन)
२.सर्वनाम - Pronoun (प्रोनाऊन)
३.विशेषण - Adjective (अॅडजेक्टिव्ह)
४.क्रियापद - Verb (व्हर्ब )
अविकारी :
५.क्रियाविशेषण - Adverb (अॅडव्हर्ब )
६.शब्दयोगी अव्यय - Preposition (प्रेपोझिशन)
७.उभयान्वयी अव्यय - Conjunction (कंजक्शन)
८.केवलप्रयोगी अव्यय - Interjection (इंटरजेक्शन )
वाक्यात केलेल्या कार्यावरून शब्दाची जात ठरत असल्यामुळे एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात निरनिराळया जातीचा शब्द म्हणून वापरला जाऊ शकतो. एकच शब्द एका वाक्यात क्रियापद म्हणून वापरला असेल तर तोच शब्द दुसऱ्या वाक्यात नाम म्हणून वापरलेला असेल, तर तिसऱ्या वाक्यात तो विशेषण असेल.
उदाहरणार्थ :
All हा शब्द
1. All men are equal. (Adjective)
2. He lost his all in the Ground. (Noun)
3. All is Well.(Pronoun)
4. She was all alone. (Adverb)
Fast हा शब्द
1.Some people fast on Monday ( Verb )
2.Monday is the day of fast for her ( Noun )
3.He is a fast runner . (Adjective )
4.He run fast. (Adverb).
#English #Grammar in Marathi
#इंग्रजी #व्याकरण मराठीत.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.