लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
क – लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा :
कलम ७ :
लैंगिक हमला :
जो कोणी, लैंगिक हेतूने बालकाच्या योनीला, शिस्नाला, गुदद्वाराला किंवा छातीला स्पर्श करील किंवा बालकाला अशा व्यक्तीच्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या योनीला, शिस्नाला, गुदद्वाराला किंवा छातीला स्पर्श करायला लावेल किंवा ज्यामध्ये लिंगप्रवेशाशिवाय शारीरिक स्पर्शाचा अंतर्भाव असेल. अशी लैंगिक हेतू अभिप्रेत असलेली अन्य कोणतीही कृती त्याने लैंगिक हमला केला असल्याचे म्हटले जाईल.