Pocso act 2012 कलम ३ : लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
प्रकरण २ :
बालकांवरील लैंगिक अपराध :
अ – लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा :
कलम ३ :
लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला :
अ)एखादी व्यक्ती, जर त्याचे शिस्न बालकाच्या योनीत, मुखात, मुत्रमार्गात, गुदद्वारात कोणत्याही मर्यादेपर्यंत घालील किंवा बालकाला त्याच्याबरोबर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर तेस करावयास लावील किंवा
ब)बालकाच्या योनीत मुत्रमार्गात किंवा गुदद्वारात कोणतीही वस्तू किंवा शिस्न नसेल असा शरीराचा कोणताही भाग कोणत्याही मर्यादेपर्यंत घालील किंवा बालकाला त्याच्याबरोबर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर तसे करावयास लावील किंवा.
क)बालकाची योनी, मुत्रमार्ग, गुदद्वार किंवा शरीराच्या कोणत्याही भागात लिंगप्रवेश करण्याच्या निमित्ताने बालकाच्या शरीराच्या कोणत्याही भागाला हाताने स्पर्श करील किंवा बालकाला त्याच्याबरोबर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर किंवा.
ड) ती बालकाच्या शिस्नाला, योनीला, गुदद्वाराला, मुत्रमार्गाला आपले तोंड लावील किंवा बालकाला अशा व्यक्तीशी किंवा इतर व्यक्तीशी तसे करण्यास सांगत असेल, तर ती लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला करते असे म्हटले जाते.

Leave a Reply