Pcpndt act कलम ९ : मंडळाच्या बैठकी :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ९ :
मंडळाच्या बैठकी :
१) मंडळ आपल्या बैठकी, विनियमांद्वारे तरतुद करण्यात येईल अशा वेळी व ठिकारी घेईल आणि अशा बैठकीचे कामकाज (अशा बैठकीच्या वेळी गणपूर्तींसह) चालविण्यच्या बाबत विनियमांद्वारे तरतूद करण्यात येईल अशा कार्यपद्धतीविषयक पालन करील :
परंतु असे की, सहा महिन्यांतून किमान एकदा मंडळाची बैठक घेण्यात येईल.
२) अध्यक्ष व त्यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी राहतील.
३) अध्यक्ष व उपाध्यक्ष जर कोणत्याही कारणास्तव मंडळाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत तर, बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी निवडून दिलेला सदस्य बैठकीच्या अध्यक्षपदी राहील.
४) मंडळाच्या कोणत्याही बैठकीपुढे येणाऱ्या सर्व प्रश्नांवरील निर्णय बैठकीला उपस्थित असलेल्या व मतदानास पात्र असलेल्या सदस्यांच्या बहुमताने घेतले जातील आणि समसमान मते पडली असतील तर अशा परिस्थितीत अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदस्थ व्यक्ती, आपले दुसरे किंवा निर्णायक मत देईल व त्याचा वापर करील.
५) पदसिद्ध सदस्यांशिवाय अन्य सदस्य, मंडळाने , विहित केल्याप्रमाणे , कोणतेही असल्यास भत्ते घेतील.

Leave a Reply