गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३क :
१(लिंग निवडीस प्रतिबंध :
वंध्यत्वाच्या क्षेत्रातील विशेषज्ञ किंवा विशेषज्ञांचा गट यांच्यासह कोणतीही व्यक्ती, एखाद्या स्त्रीवर किंवा पुरुषावर किंवा दोहोंवर किंवा त्यांच्यापैकी एकाकडून किंवा दोहोंकडून व्युत्पन्न झालेल्या कोणत्याही ऊती, भू्रण, गर्भधारित द्रव किंवा युग्मक यांच्यावर लिंग निवडीची प्रकिया स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करणार नाही किंवा करण्यास कारणीभूत किंवा साहाय्यभूत होणार नाही;)
———-
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ६ द्वारे हा मजकुर समाविष्ट करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)
