गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १६ :
१.(मंडळाची कार्ये :
मंडळाची कार्ये खालीलप्रमाणे असतील, –
एक) प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे व लिंग निवड तंत्रे यांचा वापर करण्याबाबत व त्यांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी धोरण ठरविण्यात केंद्र सकारला सल्ला देणे ;
दोन) अधिनियम व त्याखाली करण्यात आलेले नियम यांचे पुनर्विलोकन करणे व त्यांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे आणि उक्त अधिनियम व नियम यामध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणे ;
तीन) गर्भधारणा-पूर्व लिंग निवड करणे आणि ज्याची परिणती स्त्रीगर्भ हत्येत होईल अशा रीतीने प्रसव-पूर्व गर्भलिंग निर्धारण करणे या प्रथांविरुद्ध जनजागृती करणे ;
चार) आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा व आनुवंशिकीय चिकित्सालयात काम करणाऱ्या व्यक्तींनी पालन करावयाची आचारसंहिता घालून देणे ;
पाच) या अधिनियमाअन्वये घटित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मंडळांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे अणि त्यांच्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीची सुनिश्चिती करण्यासाठक्ष योग्य त्या उपाययोजना करणे ;
सहा) या अधिनियमामध्ये विहित केली असतील अशी इतर कोणतीही कार्ये .)
———–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम १३ द्वारे, कलम १६ ऐवजी दाखल करण्यात आला( १४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून )