गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १४ :
सदस्य म्हणून नियुक्तीसाठी अपात्रता :
सदस्य म्हणून एखादी व्यक्ती नियुक्त करताना, जर ती, –
(a)क) केंद्र सरकारच्या मते ज्यात नैकि अध:पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधाबद्दल सिद्धदोष ठरलेली असेल आणि त्यासाठी तिला कारावासाची शिक्षा झालेली असेल; किंवा
(b)ख) अविमुक्त नादार असेल; किंवा
(c)ग) विकल मनाची असेल व सक्षम न्यायालयाने तिला असे घोषित केले असेल ; किंवा
(d)घ) सरकारच्या किंवा सरकारची मालकी आणि नियंत्रण असलेल्या महामंडळाच्या सेवेमधून तिला काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल; किंवा
(e)ङ) केंद्र सरकारच्या मते आणि सदस्य म्हणून तिची कार्ये पार पाडताना तिला ते बाधक ठरण्याची शक्यता असेल असे, तिचे मंडळात आर्थिक किंवा इतर हितसंबंध असतील ; किंवा
(f)१.(च) केंद्र सरकारच्या मते, लिंगनिर्धारण करण्यासाठी कोणत्याही प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्याशी किवा अशा तंत्राला चालना देण्याशी अथवा लिंगनिवडीच्या कोणत्याही तंत्राशी संबंधित असेल.)
तर तिला अपात्र ठरविण्यात येईल.
——–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ११ द्वारे, खंड (च) ऐवजी दाखल करण्यात आला ( १४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून )