गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १२ :
मंडळाचे अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती :
१) या अधिनियमाअन्वये आपली कार्ये सुरळीतपणे पार पाडणे शक्य व्हावे म्हणून, मंडळाला याबाबत केलेल्या विनियमांच्या अधीन राहून (प्रतिनियुक्तीवर वा अन्यथा) त्याना आवश्यक वाटतील इतके अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करता येईल :
परंतु असे की, अशा विनियमामध्ये विनिर्दिष्ट केले असेल त्याप्रमाणे, प्रवर्गाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येईल.
२) मंडळाने नियुक्त केलेला प्रत्येक अधिकारी किंवा इतर कर्मचारी विनियमामध्ये विनिर्दिष्ट केले असेल अशा सेवाशर्तींच्या अधीन असतील आणि अशा परिश्रमिकासाठी ते हक्कदार असतील.