बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम १९ :
नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
(१) राज्य शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल.
(२) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळासमोर ठेवण्यात येईल.