Pca act 1988 कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
प्रकरण २ :
विशेष न्यायाधीशांची नियुक्ती :
कलम ३ :
विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :
१)केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिध्द करून, पुढे दिलेल्या अपराधांबाबतचे खटले चालवण्यासाठी अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल. अशा क्षेत्रासाठी किंवा क्षेत्रांसाठी किंवा यथास्थिति, अशा प्रकरणासाठी किंवा एकत्र प्रकरणांसाठी, आवश्यक तेवढया न्यायाधीशांची नियुक्ती करता येईल, ते अपराध म्हणजेच,-
(a) क) अ) या अधिनियमाखाली शिक्षायोग्य असा कोणताही अपराध;आणि
(b) ख) ब) खंड (अ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधांपैकी कोणताही अपराध करण्याचा कोणताही कट, कोणताही प्रयत्न किंवा अपराधास कोणतेही प्रोत्साहन.
२)कोणतीही व्यक्ती, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) या अन्वये, सत्र न्यायाधीश किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असल्याखेरीज या अधिनियमान्वये विशेष न्यायाधीश म्हणून नेमली जाण्यास पात्र असणार नाही.

Leave a Reply