भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
प्रकरण ४ :
प्रकरणांचे अन्वेषण :
कलम १७ :
अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही,
अ)दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत, पोलीस निरीक्षक;
ब) मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद यांच्या महानगर क्षेत्रांमध्ये, आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३(१९७४
चा २) याच्या कलम ८, पोटकलम (१) नुसार अधिसुचित केलेल्या कोणत्याही इतर महानगर क्षेत्रांच्या बाबतीत, सहायक पोलीस आयुक्त,
क)इतर ठिकाणी, पोलीस उपअधीक्षक किंवा समान दर्जाचा पोलीस अधिकारी
यांच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी, महानगर दंडाधिकारी किंवा यथास्थिति, प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय अन्वेषण करणार नाही किंवा त्यासाठी अधिपत्राशिवाय अटक करणार नाही :
परंतु, राज्य शासनाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे पोलीस, निरीक्षकाहून कमी दर्जाच्या नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यास प्राधिकृत केल्यास, त्याला महानगर दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय अशा कोणत्याही अपराधाबाबत अन्वेषण करता येईल किंवा अधिपत्राशिवाय त्यासाठी अटकही करता येईल:
पंरतु आणखी असे की, कलम १३ चे १. (पोटकलम १ चा खंड (ब)) यामध्ये निर्देशिलेल्या अपराधाबाबत, पोलीस अधीक्षकाच्या दर्जाहून खालच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास आदेशाशिवाय अन्वेषण करता येणार नाही.
———-
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ कलम ११ द्वारा (खंड (ई)) या शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.