Pca act 1988 कलम १३ : लोकसेवकाचे गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरूपाचे गैरवर्तन :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १३ :
लोकसेवकाचे गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरूपाचे गैरवर्तन :
१.(एखाद्या लोकसेवकाने खालीलप्रमाणे वर्तन केल्यास त्याने गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरुपाचे गैरवर्तन केले असे म्हटले जाईल –
अ) लोकसेवक या नात्याने त्याच्याकडे सोपवण्यात आलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही मालमत्तेचा त्याने अप्रामाणिकपणे किंवा कपटाने अपहार केला किंवा स्वत:च्या उपयोगासाठी तिचे अन्यथा परिवर्तन केले अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीस तसे करु दिले तर;
ब) जर त्याने त्याच्या पदाच्या कालावधीत हेतुपुरस्सर स्वत:ला समृद्ध केले तर;
स्पष्टीकरण १ :
जर लोकसेवकाकडे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, त्याच्या पद धारणाच्या कालावधीतील कोणत्याही वेळी, अशा आर्थिक साधनसंपत्तीच्या किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांच्या qवसगत प्रमाणात मालमत्ता त्याच्याकडे असेल किंवा असली तर, तो समाधानकारकपणे हिशेब देऊ शकणार नाही.
स्पष्टीकरण २ :
प्राप्तीची ज्ञात साधने याच्या अर्थ कोणत्याही कायदेशीर साधनाने मिळालेली प्राप्ती असा आहे.)
२)गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरूपाचे गैरवर्तन करील असा कोणताही लोकसेवक, २.(चार वर्ष) पेक्षा कमी असणार नाही, परंतु ज्यात ३.(दहा वर्ष) पर्यंत वाढ करता येईल एवढया मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस, तसेच द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
——–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ७ अन्वये पोटकलम (१) ऐवजी (२६-७-२०१८ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. २०१४ चा अधिनियम क्रमांंक १ याच्या कलम ५८ आणि अनुसूची अन्वये एक वर्ष याऐवजी (१६-१-२०१४ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. २०१४ चा अधिनियम क्रमांंक १ याच्या कलम ५८ आणि अनुसूची अन्वये सात वर्ष याऐवजी (१६-१-२०१४ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply