भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम १० :
१.(वाणिज्यिक संगठनेचा प्रभारी व्यक्ती अपराधासाठी दोषी असणे :
कलम ९ अन्वये अपराध एखाद्या वाणिज्यिक संगठनेनी केला असेल आणि असा गुन्हा कोणत्याही संचालक, व्यवस्थापक, सचिव किवा अन्य अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा संगनमताने केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले असेल तर, संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास दावित्व स्विकारतील, तसेच तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत वाढविता येइल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि ते द्रव्यदंडास ही पात्र होतील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी फर्मच्या (संस्था / कंपनी) संबंधात संचालक म्हणजे फर्ममधीला भागीदार होय.)
——–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ४ अन्वये कलम ७, ८, ९, १० ऐवजी समाविष्ट करण्यात आले.