Constitution अनुच्छेद ३९२ : अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३९२ :
अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार :
(१) कोणत्याही अडचणी, विशेषत:, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९३५ मधील तरतुदींचे या संविधानाच्या तरतुदींप्रत संक्रमण करण्यासंबंधीच्या अडचणी दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, राष्ट्रपती, आदेशाद्वारे असा निदेश देऊ शकेल की, त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीत हे संविधान, त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा अनुकूलनांसह प्रभावी होईल—मग ती अनुकूलने, फेरबदल करून वा त्यात भर घालून केलेली असोत वा काहीतरी वगळून केलेली असोत:
परंतु असे की, असा कोणताही आदेश भाग पाचच्या प्रकरण दोन अन्वये रीतसर घटित झालेल्या संसदेच्या प्रथम अधिवशेनानंतर काढला जाणार नाही.
(२) खंड (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, संसदेपुढे मांडला जाईल.
(३) या अनुच्छेदाद्वारे, अनुच्छेद ३२४ द्वारे, अनुच्छेद ३६७ चा खंड (३) द्वारे व अनुच्छेद ३९१ द्वारे राष्ट्रपतीला प्रदान केलेले अधिकार, या संविधानाच्या प्रारंभापूर्वी, डोमिनिअन ऑफ इंडियाच्या गव्हर्नर जनरलला वापरता येतील.

Leave a Reply