भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३६३-क :
१.(भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे :
या संविधानामध्ये अथवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही असेले तरी,-
(क) संविधान (सव्विसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी, राष्ट्रपतीने भारतीय संस्थानाचा अधिपती म्हणून ज्याला मान्यता दिली होती असा राजा, संस्थानिक किंवा अन्य व्यक्ती यांना अथवा जिला अशा प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी, राष्ट्रपतीने अशा अधिपतीचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिलेली होती अशा कोणत्याही व्यक्तीला, असा अधिपती किंवा अशा अधिपतीचा उत्तराधिकारी म्हणून मिळालेली मान्यता अशा प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून संपुष्टात येईल.
(ख) संविधान (सव्विसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून खासगत तनखे नष्ट करण्यात आले आहेत आणि खासगत तनख्यांच्या बाबतीतील सर्व हक्क, दायित्वे आणि आबंधने नष्ट करण्यात आलेली आहेत आणि तद्नुसार खंड (क) मध्ये निर्देशिलेला अधिपती, किंवा यथास्थिति, अशा अधिपतीचा उत्तराधिकारी अथवा अन्य कोणतीही व्यक्ती यांना खासगत तनखा, म्हणून कोणतीही रक्कम दिली जाणार नाही.)
———
१. संविधान (सव्विसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या कलम ३ द्वारे हा अनुच्छेद समाविष्ट केला.