Constitution अनुच्छेद २६३ : आंतरराज्यीय परिषदेबाबतच्या तरतुदी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
राज्या-राज्यांमधील समन्वय :
अनुच्छेद २६३ :
आंतरराज्यीय परिषदेबाबतच्या तरतुदी :
(क) राज्या-राज्यांमध्ये जे विवाद उद्भवले असतील त्यांबाबत चौकशी करणे आणि त्यांवर सल्ला देणे ;
(ख) राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यांत सामाईक हितसंबंध आहे अशा विषयांबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे ; अथवा
(ग) अशा कोणत्याही विषयावर शिफारशी आणि विशेषत:, त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारशी करणे, ही कर्तव्ये सोपवता येण्यासारख्या एखाद्या परिषदेची स्थापना केल्याने लोकहित साधले जाईल, असे केव्हाही राष्ट्रपतीला वाटले तर, राष्ट्रपतीने आदेशाद्वारे अशी परिषद स्थापन करणे आणि तिने करावयाच्या कर्तव्यांचे स्वरूप व तिची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करणे, हे विधिसंमत असेल.

Leave a Reply