Bsa कलम १४९ : उलटतपासणीत कायदेशीर असलेले प्रश्न :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४९ :
उलटतपासणीत कायदेशीर असलेले प्रश्न :
जेव्हा साक्षीदाराची उलटतपासणी होईल तेव्हा, यात यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या प्रश्नांशिवाय आणखी त्याला पुढील प्रकारचे प्रश्न विचारता येतील; ज्या कोणत्याही प्रश्नांचा रोख, –
(a) क) त्याच्या सत्यवादित्वाची परीक्षा घेण्याकडे,
(b) ख) तो कोण आहे व त्याचे जीवनातील स्थान काय आहे याचा शोध घेण्याकडे, किंवा
(c) ग) त्याच्या चारित्र्याला धक्का पोचवून त्याची विश्वासपात्रता डळमळीत करण्याकडे असतो अशा प्रश्नांची उत्तरे तो प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे गुन्ह्यात गोवला जाण्यास साधक असली अथवा त्यामुळे तो शिक्षेला किंवा समपहणाला पात्र होणार असला अथवा प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे तो त्यास पात्र होण्यास ती उत्तरे साधक असली तरी, असे प्रश्न विचारता येतील :
परंतु असे की, भारतीय दंडसंहितेच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७० किंवा कलम ७१ खालील अपराधासंबंधीच्या खटल्यात किंवा जेथे संमतीचा प्रश्न हा वादप्रश्न असेल अशाबाबतीत असा अपराध करण्याचा प्रयत्न केल्याच्या संबंधीच्या खटल्यात पीडित व्यक्तीच्या सर्वसाधारण अनैतिक चारित्र्याचा पुरावा दाखल करणे किंवा त्या व्यक्ती उलटतपासणीत त्याबाबत प्रश्न विचारणे किंवा अशी संमती किंवा संमतीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी, पीडित व्यक्तीचा अन्य व्यक्तीबरोबरचा पूर्वीचे लैqगक संबंध याचे पुरावे देणे अनुशेष असणार नाही.

Leave a Reply