भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०७ :
पुरावा स्वीकार्य होण्यासाठी शाबीत करावयाचे तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :
जे कोणतेही तथ्य कोणत्याही व्यक्तीला अन्य एखाद्या तथ्याबद्दल पुरावा देणे शक्य व्हावे म्हणून शाबीत करण्याची जरूरी असते ते शाबीत करण्याची जबाबदारी असा पुरावा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीवर असते.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) हा (बी) चे मृत्युकालीन अधिकथन शाबीत करु इच्छितो. (ऐ) ने (बी) चा मृत्यु शाबीत केला पाहिजे.
(b) ख) हरवलेल्या दस्तऐवजातील मजकूर (ऐ) दुय्यम पुराव्याने शाबीत करु इच्छितो. दस्तऐवज हरवलेला आहे असे (ऐ) ने शाबीत केले पाहिजे.