अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम २ :
व्याख्या :
१)या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,
(a) क) अत्याचार याचा अर्थ, कलम ३ खालील शिक्षापात्र अपराध असा आहे;
(b) ख) संहिता याचा अर्थ, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) असा आहे;
(bb) १.(खख)अवलंबित याचा अर्थ, जे अत्याचारित व्यक्तीच्या आधार आणि व्यवस्था यावर अवलंबून आहेत अशी पत्नी, पती, मुले, वडीलधारी, भाऊ आणि बहीण अश्या व्यक्ती.
(bc) खग)आर्थिक बहिष्कार याचा अर्थ,
एक)त्याच्याबरोबर व्यवहार न करणे, मजुरीवर कामावर न घेणे किंवा दुसऱ्या व्यक्तिबरोबर व्यवसाय न करणे; किंवा
दोन)नोकरी करण्याची संधी नाकारणे किंवा कोणत्याही बदल्यामध्ये किंवा कंत्राट मिळण्याची संधी नाकारणे; किंवा
तीन)व्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे सहज साध्य होणारी गोष्ट करण्यास नकार देणे; किंवा
चार)दुसऱ्या व्यक्तीबरोबर धंद्याबाबत किंवा व्यवसायाबाबत संबंध ठेवण्यास अडथळा निर्माण करणे;
(bd) खघ)एकमेव (अनन्य) न्यायायल याचा अर्थ या अधिनियमातील कलम १४ च्या उपकलम (१) अन्वये एकमेव (अनन्य) असे अपराध विरोधात स्थापन केलेले न्यायालय;
(be) खड)वन अधिकार याचा अर्थ मान्य अनुसूचित जनजाती आणि इतर परंपरागत वनामध्ये वस्ती करणारा (वन अधिकार मान्य करणारा) अधिनियम, २००६ (२००७ चा २) मध्ये दिल्याप्रमाणे असणारा अर्थ;
(bf) खच)हाताने मैला सफाई काम करणारा याचा अर्थ हाताने मैला साफ करणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम २०१३ (२०१३ चा २५) यातील कलम २ च्या पोटकलम (१) च्या खंड (ज (इंग्रजी जी) मध्ये दिल्याप्रमाणे असेल.
(bg) खछ)लोकसेवक याचा अर्थ भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम २१ मध्ये स्पष्ट केलेला, याचबरोबर लोकसेवक म्हणून इतर कोणत्याही त्यावेळी अस्तित्वात असलेल्या अधिनियमाखाली यामध्ये केंद्रशासनामध्ये किंवा राज्य शासनामध्ये आपल्या शासकीय कर्तव्यानुसार काम करणारा जसे असेल त्याप्रमाणे;)
(c) ग)अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती या संज्ञाना (शब्दप्रयोगांना) संविधानाच्या अनुच्छेद ३६६ च्या अनुक्रमे खंड (२४) व खंड (२५) मध्ये नेमुन देण्यात आलेलेच अर्थ असतील;
(d) घ)विशेष न्यायालय याचा अर्थ कलम १४ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेले एखादे सत्र न्यायालय असा आहे;
(e) ड)विशेष सरकारी अभियोक्ता याचा अर्थ, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेला एखादा सरकारी अभियोक्ता किंवा कलम १५ मध्ये निर्देशित केलेला एखादा अधिवक्ता, असा आहे;
(ea)१.(डक)अनुसूची याचा अर्थ या नियमाला जोडलेली अनुसूची;
(eb) डख)सामाजिक बहिष्कार याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला इतर व्यक्तिंनी सेवा न देणे किंवा तिचा त्याच्याकडून स्वीकार न करणे किंवा कोणतीही चालीरीतीची सेवा न घेणे किंवा सामाजिक संबंध ठेवण्यापासून रोखणे जे इतर व्यक्तिबरोबर राखणारे संबंध असतील ते किंवा इतरांपासून अलिप्त ठेवणे;
(ec) डग)अत्याचारग्रस्त याचा अर्थ जी व्यक्ती कलम २च्या पोटकलम (१) च्या खंड (क) अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या व्याख्येत येता आणि ज्याने शारीरिक, भावनिक, मानसिकदृष्ट्या, मानसिक किंवा अर्थिक हानी किंवा त्याच्या मालमत्तेला हानी झाली आहे तो व्यक्ति या अधिनियमा अन्वये कोणतेही अपराधामुळे आणि यामध्ये त्याचे नातेवाईक, कायदेशिर पालक आणि कायदेशिर वारस यांचा समावेश असेल.
(ed) डघ)साक्षीदार याचा अर्थ कोणतीही व्यक्ति जिला घटना आणि परिस्थिती याची माहिती आहे; किंवा जिच्या ताब्यात कोणतीही माहिती किंवा तपास, चौकशी किंवा कामकाज करण्याच्या दृष्टिने असेल असा आहे. कोणताही गुन्हा या अधिनियमाखाली येत असेल जी माहितीच्या दृष्टिने जरुरीचे आहे किंवा आपला जबाब किंवा कामकाज या केसच्या बाबतीत आणि गुन्हयातील अत्याचाराग्रस्ताचा यात समावेश होता;)
(f) २.(च)या अधिनियमामध्ये वापरलेले परंतू व्याख्या न केलेले आणि भारतीय दंड संहिता १८६० (१८६० चा ४५) , भारतीय पुरावा अधिनियक, १८७२ (१८७२ चा १) किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अनुक्रमे नेमून देण्यात आलेलेच अर्थ असतील.)
२)कोणतीही अधिनियमिती किंवा तिचा कोणताही उपबंध अंमलात नसेल अशा कोणत्याही क्षेत्राच्या संबंधात या अधिनियमातील त्या अधिनियमितीच्या किंवा उपबंधाच्या कोणत्याही निर्देशाचा अर्थ त्या क्षेत्रात कोणताही तत्सम कायदा अंमलात असेल तर तो त्या कायद्याचा निर्देश आहे असा लावण्यात येईल.
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ द्वारा (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ द्वारा खंड (च) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.