SCST Act 1989 कलम १ : संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९
प्रस्तावना :
प्रकरण १:
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
अनुसूचित जातींच्या व अनुसूचित जमातींच्या व्यक्तींवर केल्या जाणाऱ्या अपराधांस प्रतिबंध करण्यासाठी, अशा अपराधांच्या संपरीक्षेसाठी किंवा अशा अपराधांचे खटले चालविण्याकरिता १(विशेष न्यायालये आणि एकमेव (अनन्य) विशेष न्यायालये) स्थापन करणे आणि अशा अपराधांना बळी पडलेल्यांना दाद देणे व त्यांचे पुनर्वसन करणे यांसाठी आणि त्यांच्याशी संबंधित वा आनुषंगिक बाबींसाठी उपबंध करण्याकरिता अधिनियम.
भारतीय प्रजासत्ताकाच्या चाळिसाव्या वर्षी संसदेकडून खालीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येवो :-
———
१)या अधिनियमास, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९, असे म्हणता येईल.
२)त्याचा विस्तार २.(***) संपूर्ण भारतभर आहे.जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरुन संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार आहे.
३)केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करील अशा दिनांकास तो अंमलात येईल.
———
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम २ द्वारे (विशेष न्यायालये) याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ९५ व अनुसूची ५ द्वारा (जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरुन) हे शब्द (३१-१०-२०१९ पासून) वगळण्यात आले.
३. ३० जानेवारी १९९०, अधिसूचना क्रमांक एस.ओ. १०६ (ई), दिनांक २९ जानेवारी १९९०, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, कलम ३ (दोन) पहा.

Leave a Reply