Rti act 2005 कलम ६: माहिती मिळविण्याकरिता विनंती करणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम ६:
माहिती मिळविण्याकरिता विनंती करणे :
१)या अधिनियमान्वये कोणतीही माहिती मिळविण्याची इच्छा असलेली व्यक्ति, त्याने किंवा तिने मागणी केलेल्या माहितीचा तपशील विनिर्दिष्ट करणारी, इंग्रजीमधील किंवा qहदीमधील अथवा अर्ज ज्या क्षेत्रात करण्यात येत असेल त्या क्षेत्राच्या राजभाषेमधील लेखी स्वरुपात केलेली किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे केलेली विनंती, विहित करण्यात येईल अशा फीसह,-
(a)क)संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याकडे, किंवा यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकाऱ्याकडे ;
(b)ख)केंद्रीय सहाय्यक जन माहिती अधिकाऱ्याकडे, किंवा यथास्थिति, राज्य सहायक जन माहिती अधिकाऱ्याकडे;
सादर करील :
परंतु, जेव्हा अशी विनंती लेखी स्वरुपात करता येऊ शकत नसेल अशा बाबतीत, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी, मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तिस, ती लेखी स्वरुपात आणण्यासाठी सर्व वाजवी सहाय्य करील.
२)माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारास, माहितीसाठी विनंती करण्यास कोणतीही कारणे देण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल त्याखेरीज अन्य कोणताही वैयक्तिक तपशील देण्यास , भाग पाडण्यात येणार नाही.
३)(एक) जी माहिती अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल; किंवा
(दोन) ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल,
अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यास आला असेल त्याबाबतीत, ज्याच्याकडे असा अर्ज करण्यास आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण, असा अर्ज किंवा त्यास योग्य वाटेल असा त्याचा भाग, अशा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील आणि अशा हस्तांतरणाबाबत अर्जदारास तात्काळ माहिती देईल :
परंतु, या पोटकलमानुसार करावयाचे अर्जाचे हस्तांतरण, व्यवहार्य असेल तितक्या लवकल करण्यात येईल, मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून पाच दिवसांपेक्षा अधिक विलंबाने करण्यात येणार नाही.

Leave a Reply