माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम २८ :
सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार :
१)या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी, सक्षम प्राधिकाऱ्यास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.
२)विशेषत:, आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेस बाध न येऊ देता, या नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतूद करता येईल :-
(एक) कलम ४ च्या पोटकलम (४) अन्वये ज्याचा प्रसार करावयाचा आहे अशा साहित्याच्या प्रसिद्धी माध्यमाच्या खर्चाएवढी किंवा मुद्रणाच्या खर्चाएवढी किंमत;
(दोन)कलम ६ च्या पोटकलम (१) अन्वये देय असलेली फी;
(तीन)कलम ७ च्या पोटकलम (१) अन्वये देय असलेली फी; आणि
(चार) विहित करणे आवश्यक असेल अशी अथवा विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब.