माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम २२ :
अधिनियमाचा अधिभावी (बलाढ्य) परिणाम असणे :
या अधिनियमाच्या तरतुदी या, शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ (१९२३ चा १९) यामध्ये त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये किंवा या अधिनियमाखेरीज कोणत्याही अन्य कायद्याच्या आधारे अंमलात असणाऱ्या कोणत्याही संलेखामध्ये त्याच्याशी विसंगत असे काहीही अंतर्भूत असले तरी , अंमलात येतील.