महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ८ :
संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक :
(१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्याला आवश्यक वाटतील अशा संख्येतील संरक्षण अधिकाऱ्यांची प्रत्येक जिल्हासाठी नेमणूक करील आणि तसेच संरक्षण अधिकाऱ्याला या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा कोणत्या क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये वापर करता येईल आणि कर्तव्यांचे पालन करता येईल ते अधिसूचित करील.
(२) संरक्षण अधिकारी, शक्य असेल तितपत महिला असेल आणि असा अधिकारी विहित करण्यात येतील अशा अर्हता आणि असा अनुभव असणारा असेल.
(३) संरक्षण अधिकाऱ्याच्या आणि त्याला दुय्यम असतील अशा इतर अधिकाऱ्यांचा सेवेच्या अट व शर्ती या विहित करण्यात येतील याप्रमाणे असतील.