Pwdva act 2005 कलम ५ : पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ५ :
पोलीस अधिकारी, सेवा पुरविणारे आणि दंडाधिकारी यांची कर्तव्ये :
एखादा पोलीस, संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणारा किंवा दंडाधिकारी यांच्याकडे कौटुंबिक अत्याचाराची एखादी तक्रार आली असेल किंवा तो एखादी कौटुंबिक अत्याचाराची घटना घडत असताना त्या ठिकाणी हजर असेल किंवा त्याला एखाद्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेबाबत माहिती देण्यात आली असेल अशावेळी तो पीडित व्यक्तीला, –
(a)क)(अ) या अधिनियमाखालील संरक्षण आदेश, आर्थिक साहाय्यविषयक आदेश, ताबा आदेश, निवास आदेश, नुकसानभरपाई आदेश यापैकी एक किंवा अधिक आदेशांद्वारे साहाय्य मिळविण्यासाठी अर्ज करण्याच्या तिच्या हक्काची माहिती देईल;
(b)ख)(ब) सेवा पुरविणाऱ्याकडून सेवा (उपलब्ध असल्याबद्दलची माहिती देईल.)
(c)ग) (क) संरक्षण अधिकाऱ्यांच्या सेवा (उपलब्ध असल्याबद्दलची माहिती देईल.)
(d)घ) (ड) विधिविषयक सेवा प्राधिकरणे, अधिनियम, १९८७ (१९८७ चा ३९) याअन्वये मोफत विधिविषयक सेवांबाबतच्या तिच्या हक्काची माहिती देईल;
(e)ङ)(ई) संबंध असेल तेथे भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५) याच्या कलम ४९८-अ अन्वये तक्रार दाखल करण्याच्या तिच्या हक्काची माहिती देईल :
परंतु या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीचा दखली अपराध केल्याबाबतची माहिती मिळाल्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्याच्या कर्तव्यापासून पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही रीतीने मुक्त करते असा तिचा अर्थ लावण्यात येणार नाही.

Leave a Reply