Pwdva act 2005 कलम ४ : संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
प्रकरण ३ :
संरक्षण अधिकारी, सेवा पुरविणारे इत्यादींचे अधिकार व कर्तव्ये :
कलम ४ :
संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे आणि माहिती देणाऱ्याला दायित्वातून सूट :
(१) एखादी कौटुंबिक अत्याचाराची कृती करण्यात आली आहे, किंवा करण्यात येत आहे, किंवा करण्यात येण्याची शक्यता आहे यावर विश्वास ठेवण्यास कारण असेल अशी कोणतीही व्यक्ती त्यासंबंधीची माहिती संबंधित संरक्षण अधिकाऱ्याला देऊ शकेल.
(२) पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी सद्हेतूने माहिती दिल्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कोणतेही दिवाणी किंवा फौजदारी दायित्व निर्माण केले असे होणार नाही.

Leave a Reply