महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २६ :
इतर दावे आणि कायदेशीर कार्यवाही यामधील साहाय्य :
(१) कलम १८, १९, २०, २१ व २२ अन्वये उपलब्ध असलेले कोणतेही साहाय्य, परिणाम झालेल्या बाधित व्यक्तीने आणि उत्तरवादीने या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर सुरू केलेल्या दिवाणी न्यायालयासमोरील, कुटुंब न्यायालयासमोरील किंवा फौजदारी न्यायालयासमोरील कार्यवाहीतसुद्धा मागता येईल.
(२) पोयकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले कोणतेही साहाय्य हे बाधित व्यक्तीला दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयासमोरील अशा दाव्यात किंवा कायदेशीर कार्यवाहीत मागता येईल, अशा साहाय्याव्यतिरिक्त जादा सहाय्य असेल.
(३) बाधित व्यक्तीने या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाही व्यतिरिक्त इतर कार्यवाहीत कोणतेही सहाय्य मिळविले असेल तर, अशाबाबतीत, असे साहाय्य देण्यात आल्याचे दंडाधिकाऱ्याला कळविणे तिच्यावर बंधनकारक असेल.