महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २५ :
आदेशाचा कालावधी आणि त्यात फेरफार करणे :
(१) कलम १८ खालील संरक्षण आदेश, बाधित व्यक्ती तो मागे घेण्यासाठी अर्ज करेपर्यंत अमलात राहील.
(२) बाधित व्यक्ती किंवा उत्तरवादी यांच्याकडून अर्ज मिळाल्यावर, परिस्थितीत असा बदल झाला आहे की, आदेशात फेरफार करणे, त्यात फेरबदल करणे किंवा तो मागे घेणे गरजेचे आहे. याबाबत दंडाधिकाऱ्याचे समाधान झाले असेल तर, तो त्याला समुचित वाटतील असे आदेश त्याची कारणे लेखी नमूद करून काढू शकेल.