Pwdva act 2005 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २००५
(सन २००५ चा ४३) १३ सप्टेंबर २००५
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
कुटुंबामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिलांच्या बाबतीत संविधानाने हमी दिलेल्या महिलांच्या हक्कांचे अधिक प्रभावी संरक्षण करण्याची आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अधिनियम.
त्याअर्थी, या द्वारे भारतीय गणराज्याच्या छप्पनाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
—————-
(१) या अधिनियमास, महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २००५ असे म्हणावे.
(२) तो १.(***) संपूर्ण भारतास लागू असेल.
(३) तो, केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील, अशा २.(तारखेला) अमलात येईल.
——-
१. २०१९ चा अधित्रनयम क्रमांक ३४ याच्या कलम ९५ व अनुसूची पाच द्वारा (३१-१०-२०१९ पासून) जम्मू व काश्मीर राज्य वगळून हे शब्द वगळण्यात आले.
२. ६ ऑक्टोबर २००६, भारताचे राजपत्र (असधारण) भाग २, अनुभाग ३ (दोन) अधिसूचना क्र. का. आ. १७७६(ई), दिनांक १७-१०-२००६, द्वारा.

Leave a Reply