महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १३ :
नोटीस बजावणे :
(१) कलम १२ अन्वये निश्चित केलेल्या सुनावणीच्या तारखेची नोटीस दंडाधिकाऱ्याकडून संरक्षण अधिकाऱ्याकडे देण्यात येईल, असा अधिकारी, ती नोटीस, उत्तरवादीवर आणि दंडाधिकाऱ्याने विहित केली असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीवर ती मिळाल्यापासून जास्तीत जास्त दोन दिवसांच्या कालावधीत, किंवा दंडाधिकाऱ्याकडून परवानगी देण्यात आली असेल अशा नंतरच्या कालावधीत विहित करण्यात आली असतील अशा साधनांद्वारे बजावून घेईल.
(२) संरक्षण अधिकाऱ्याने नोटीस बजावण्याची विहित नमुन्यात केलेली घोषणा ही, दंडाधिकाऱ्याने निदेश दिल्याप्रमाणे उत्तरवादीवर आणि इतर कोणत्याही व्यक्तींवर नोटीस बजावण्याचा पुरावा असेल, मात्र तशी बजावणी झाल्याच्या विरूद्ध सिद्ध करण्यात आलेले नसेल तरच.