Posh act 2013
प्रकरण ६ :
मालकाची कर्तव्ये :
कलम १९ :
मालकाची कर्तव्ये :
(a)क)(अ) प्रत्येक मालक कामाच्या ठिकाणी कामाचे सुरक्षित वातावरण पुरवील, त्यात कामाच्या ठिकाणी संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षितता मिळण्याचा अंतर्भाव असेल;
(b)ख)(ब) कामाच्या ठिकाणामधील कोणत्याही ठळक जागी, लैंगिक छळवणुकीचे दंडनीय परिणाम; आणि कलम ४ च्या पोटकलम (१) अन्वये अंतर्गत समिती स्थापन करणारा आदेश लावील;
(c)ग) (क) या अधिनियमाच्या तरतुदीसंबंधी कर्मचाऱ्यांना सचेतन करण्याकरिता विहित करण्यात येईल अशा रीतीने, ठराविक कालांतराने कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम आणि अंतर्गत समितीच्या सदस्यांसाठी कार्याभिमुख कार्यक्रम आयोजित करील;
(d)घ)(ड) तक्रारीसंबंधी कार्यवाही करण्याकरिता आणि चौकशी करण्याकरिता अंतर्गत समितीस, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीस आवश्यक सुविधा पुरवील;
(e)ङ)(इ) अंतर्गत समितीसमोरील, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती समोरील उत्तरवादीच्या व साक्षीदारांच्या उपस्थितीची खात्री करण्यामध्ये सहाय्य करील;
(f)च)(फ) कलम ९ च्या पोटकलम (१) अन्वये केलेल्या तक्रारीच्या संबंधात तिला आवश्यक असेल अशी माहिती अंतर्गत समितीस, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीस उपलब्ध करून देईल;
(g)छ)(ग) जर महिलेने भारतीय दंड संहितेन्वये (१९६० चा ४५) किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये अपराधाच्या संबंधात तक्रार दाखल करण्याचा पर्याय निवडला असेल तर, तिला सहाय्य करील;
(h)ज)(ह) अपकृत्य करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध, भारतीय दंड संहितेअन्वये किंवा त्या त्या वेळी अंमलात असणाऱ्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये कारवाई सुरू करण्याची व्यवस्था करणे, किंवा जेव्हा अपकृत्य करणारा, जर पीडित महिलेस तसे वाटत असेल तर, लैंगिक छळाची घटना घडून आली त्या कामाच्या ठिकाणामधील कर्मचारी नसेल तेव्हा;
(i)झ)(आय) लैंगिक छळवणुकीस, सेवा नियमांखालील गैरवर्तणूक समजेल अशी आणि अशा गैरवर्तणुकीसाठी कारवाई करील;
(j)ज)(ज) अंतर्गत समितीने अहवाल वेळेवर सादर करण्याचे संनियंत्रण करील.