लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
ई – लैंगिक सतावणूक आणि त्यासाठी शिक्षा :
कलम ११ :
लैंगिक सतावणूक :
जेव्हा एकादी व्यक्ती लैंगिक हेतूने
एक) कोणताही शब्द उच्चारते किंवा कोणताही आवाज करते किंवा असा शब्द किंवा आवाज ऐकू जाईल या हेतूने कोणताही हावभाव करते किंवा शरीराचा कोणताही अवयव किंवा भाग दाखवते किंवा बालक पाहील असा हावभाव करते किंवा शरीराचा अवयव किंवा भाग दाखवते किंवा
दोन) अशी व्यक्ती किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला पाहता यावे म्हणून बालकाला त्याचे शरील किंवा त्याच्या शरीराचा कोणताही भाग दाखवायला सांगते किंवा
तीन) संभोगवर्णनपर प्रयोजनासाठी, बालकाला कोणत्याही स्वरूपातील किंवा माध्यमातील कोणतीही वस्तू दाखवते किंवा
चार) एकतर प्रत्यक्षपणे किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल किंवा इतर कोणत्याही साधनाद्वारे वारंवार किंवा सातत्याने बालकाचा पाठलाग करते किंवा त्याला पाहते किंवा त्याच्याशी संपर्क साधते किंवा
पाच) लैंगिक कृतीत बालकाच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा प्रसार माध्यमातील कोणत्याही प्रकारामध्ये वापर करण्यास इलेक्ट्रॉनिक फिल्म किंवा डिजिटल किंवा कोणत्याही साधनाद्वारे खरे किंवा बनावट चित्रण करण्यास किंवा लैंगिक कृतीमध्ये बालकाला सहभागी होण्यास धमकी देत असेल किंवा
सहा) संभोगपर प्रयोजनार्थ बालकाला भूरळ पाडीत असेल किंवा त्यासाठी त्याल आमिष दाखवत असेल तेव्हा अशी व्यक्ती बालकाची लैंगिक सतावणूक करते असे म्हटले जाईल
स्पष्टीकरण :
ज्यामध्ये लैंगिक हेतूचा अंतर्भाव असेल असा कोणताही प्रश्न हा एक तथ्यविषयक प्रश्न असेल.