Pocso act 2012 कलम ९ : गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
ड – गंभीर स्वरुपाचा लैंगिक हमला आणि त्यासाठी शिक्षा :
कलम ९ :
गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला :
अ) जो कोणी, पोलीस अधिकारी बालकावर
एक) त्याची नियुक्ती केलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दील किंवा जागेत किंवा
दोन) कोणत्याही स्टेशन हाऊसच्या जागेत मग ती त्याची नियुक्ती केलेल्या पोलीस ठाण्यात स्थित असो किंवा नसो किंवा
तीन) त्याचे कर्तव्य करीत असताना किंवा अन्यथा किंवा
चार) जेथे पोलीस अधिकारी म्हणून माहीत असेल किंवा ओळखला जात असेल तेथे लैंगिक हमला करील किंवा
ब) जो कोणी सशस्त्र दलाचा किंवा सुरक्षा दलाचा सदस्य, बालकावर
एक) ज्या क्षेत्रात त्या व्यक्तीला तैनात केले असेल त्या क्षेत्राच्या हद्दीत किंवा
दोन) सुरक्षा दलाच्या किंवा सशस्त्र दलाच्या अधिपत्याखालील कोणत्याही क्षेत्रात किंवा
तीन) त्याचे कर्तव्य करीत असताना किंवा अन्यथा किंवा
चार) जेथे सुरक्षा किंवा सशस्त्र दलाचा सदस्य म्हणून माहीत असेल किंवा ओळखला जात असेल तेथे,
लैंगिक हमला करील किंवा
क) जो कोणी लोकसेवक बालकावर लैंगिक हमला करील किंवा
ड) जो कोणी त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये स्थापन केलेल्या तुरूंग किंवा सुधारगृह किंवा संरक्षणगृह किंवा निरीक्षणगृह किंवा ताब्यात ठेवण्याचे किंवा देखभाल किंवा संरक्षण करण्याचे कोणतेही ठिकाण यामधील व्यवस्थापनवर्ग किंवा कर्मचारीवर्ग हा असा तुरूंग किंवा सुधारगृह किंवा संरक्षणगृह किंवा निरीक्षणगृह किंवा ताब्यात ठेवण्याचे किंवा संरक्षण करण्याचे कोणतेही ठिकाण येथे सहवासी असलेल्या बालकावर लैंगिक हमला करील किंवा
ई) जो कोणी रूग्णालयाचा मग ते शासकीय असो किंवा खासगी असो व्यवस्थापनवर्ग किंवा कर्मचारी वर्ग हा त्या रूग्णालयात बालकावर लैंगिक हमला करील किंवा
फ) शैक्षणिक संस्थेच्या किंवा धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापनवर्गातील किंवा कर्मचारीवर्गातील जो कोणी त्या संस्थेतील बालकावर लैंगिक हमला करील किंवा
ग) जो कोणी बालकावर सामूहिकपणे लैंगिक हमला करील किंवा
स्पष्टीकरण : जेव्हा एखाद्या गटातील एका किंवा अधिक व्यक्तीकडून त्यांच्या सामाईक हेतूच्या पुरस्मरणार्थ एखादे बालक लैंगिक हमल्यास बळी पडले असेल तेव्हा या खंडाच्या अर्थांतर्गत अशा व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्तीने सामूहिक लैंगिक हमला केला असल्याचे मानण्यात येईल आणि अशी प्रत्येक व्यक्ती ही जणू काही ती कृती तिने एकट्याने केली होती असे समजून त्या कृतीस जबाबदार असेल.
ह) जो कोणी प्राणघातक हत्यारे आग तापलेले पदार्थ किंवा क्षारक पदार्थ यांचा वापर करून बालकावर लैंगिक हमला किंवा
आय) जो कोणी बालकाच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरेल असा किंवा शरीराला हानी करील व इजा पोहोचविण्यास किंवा लैंगिक अवयवाला इजा पोहोचविण्यास कारणीभूत ठेरल असा लैंगिक हमला किंवा
जे) जो कोणी बालकावर
एक) मानसिक स्वास्थ अधिनियम, १९८७, (१९८७ चा १४ याच्या कलम २ च्या खंड (एल) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे, बालकाला शारीरिकदृष्ट्या असमर्थ करणारा किंवा बालकाला मनोरूग्ण बनविण्यास कारणीभूत ठरेल असा किंवा नियमित कामे पार पाडण्यास बालक तात्पुरते किंवा कायमस्वरूपी असमर्थ ठरेल अशा कोणत्याही प्रकारच्या किंवा दुर्बलतेस कारणीभूत ठरेल असा किंवा
दोन) बालकाला एचआयव्ही किंवा इतर कोणत्याही जीवघेण्या आजाराची किंवा संसर्गाची बाधा होऊन, ते नियमित कामे पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ ठरल्याने किंवा मनोरूग्ण झाल्याने बालकास एकतर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी हानी पोहोचेल असा; लैंगिक हमला करील किंवा
के) जो कोणी, बालकाच्या मानसिक किंवा शारीरिक विकलांगतेचा फायदा घेऊन त्या बालकावर लैंगिक हमला करील किंवा
एल) जो कोणी, बालकावर एकापेक्षा अधिक वेळा किंवा पुन्हा पुन्हा लैंगिक हमला करील किंवा
एम) जो कोणी, बारा वर्षाखालील बालकावर लैंगिक हमला करील किंवा
एन) जो कोणी, बालकाचा रक्ताचा किंवा दत्तक घेतलेला किंवा विवाहवस्थेतील किंवा पालकत्वाचा किंवा जोपासना करणारा किंवा बालकाच्या पालकासोबत कौटुंबिक नातेसंबंध असणारा किंवा बालकासोबत एकाच किंवा सामाईक किंवा घराघरात राहणारा नातेवाईक बालकावर लैंगिक हमला करील किंवा
ओ) जो कोणी बालकाला सेवा पुरवणाऱ्या कोणत्याही संस्थेची मालकी असणाऱ्यांमधील किंवा व्यवस्थापनातील किंवा कर्मचारीवर्गातील बालकावर अशा संस्थेत लैंगिक
हमला करील किंवा
पी) बालकाचा विश्वास असणारा किंवा प्राधिकार असणारा जो कोणी संस्थेत किंवा बालकाच्या घरी किंवा अन्य कोणत्याही जागी बालकावर लैंगिक हमला करील किंवा
क्यू) जो कोणी, बालक गरोदर आहे हे माहीत असूनही बालकावर लैंगिक हमला करील किंवा
आर) जो कोणी बालकावर लैंगिक हमला करील आणि बालकाचा खून करण्याचा प्रयत्न करील किंवा
एस) जो काणी १.(जातीय किंवा पंथीय हिंसाचार किंवा नैसर्गिक विपत्ती किंवा यासारखी कोणतीही परिस्थिती निर्माण) करीत असताना बालकावर लैंगिक हमला करील किंवा
टी) ज्याला या अधिनियमाखालील केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही लैंगिक अपराधाबद्दल यापूर्वी दोषी ठरलेले असेल असा जो कोणी बालकावर लैंगिक हमला करील किंवा
यू) जो कोणी, बालकावर लैंगिक हमला करील आणि बालकाला नग्न करील किंवा त्याला लोकांकडून नग्नपणे फिरवील त्याने गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला केला असल्याचे म्हटले जाईल.
२.(व्ही) जो कोणी, या आशयाने कि एखादा बालक लैंगिक हमल्याच्या प्रयोजनासाठी शीघ्र लैंगिक परिपक्वता प्राप्त करण्यासाठी, एखाद्या बालकाला एखादे मादक द्रव्य, हार्मोन किंवा एखादा रासायनिक पदार्थ प्राषण करण्यासाठी प्रेरित करील, उत्प्रेरित करील, मोहात पाडिल किंवा प्रपीडित करील किंवा देईल किंवा देण्यासाठी कोणाला निदेश देईल किंवा घेण्यासाठी सहायता करील.)
जो कोई इस आशय से कि कोई बालक प्रवेशन लैंगिक हमले के प्रयोजन के लिए शीघ्र लैंगिक परिपक्वता प्राप्त करे, किसी बालक को कोई मादक द्रव्य, हार्मोन या कोई रासायनिक पदार्थ लिए जाने के लिए प्रेरित करता है, उत्प्रेरित करता है, फुसलाता है या प्रपीडित करता है या देता है या देने के लिए किसी को निदेश देता है या लिए जाने में सहायता करता है ।
———
१. सन २०१९ चा २५ चा कलम ९ अन्वये जातीय किंवा पंथीय हिंसाचार या शब्दांऐवजी सामविष्ट करण्यात आले.
२. सन २०१९ चा २५ कलम ९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply