लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ६ :
१.(गंभीर स्वरूपाच्या लिंगप्रवेश अंतर्भूत असलेल्या लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा :
१) जो कोणी, लिंगप्रवेश अतंर्भूत असलेला गंभीर स्वरुपाचा लैंगिक हमला करील तो वीस वर्षापेक्षा कमी नसेल; परंतु आजीव कारावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या कारावासाची असूू शकेल इतक्या मुदीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस व द्रव्यदंडासही पात्र असेल किंवा तो मृत्यु दंडा पात्र असेल.
२) पोट-कलम (१) नुसार लादलेला दंड न्याय्य आणि वाजवी असेल आणि पीडिताला वैद्यकीय खर्च आणि अशा पीडिताचे पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी दिले जाईल.)
जो कोणी, लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला करील, त्याला दहा वर्षांपेक्षा कमी नसेल; परंतु आजीव कारावा कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस व द्रव्यदंडासही पात्र असेल.)
——–
१. २०१९ चा अधिनियम २५ कलम ५ अन्वये कलम ६ ऐवजी समाविष्ट करण्यात आला.