Pocso act 2012 कलम ३९ : तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
प्रकरण ९ :
संकीर्ण :
कलम ३९ :
तज्ज्ञ व्यक्ती इ. चे साहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्त्वे :
याबाबतीत करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून राज्य शासन बालकाला न्यायचौकशी पूर्व व न्यायचौकशीच्या वेळी साहाय्य करण्यासाठी अशासकीय संघटना, व्यावसायिक व तज्ज्ञ किंवा मानसशास्त्र, समाजकार्य, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य व बालविकास असलेल्या व्यक्ती यांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करील.

Leave a Reply